बगदादीला ठार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'त्या' कुत्र्याचा फोटो डोनाल्ड ट्रम्पकडून ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 09:56 AM2019-10-29T09:56:15+5:302019-10-29T09:56:28+5:30

आयएसआयएसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादीचा शनिवारी खात्मा करण्यात आला.

abu bakr al baghdadi death donald trump releases photo of military dog | बगदादीला ठार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'त्या' कुत्र्याचा फोटो डोनाल्ड ट्रम्पकडून ट्विट

बगदादीला ठार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'त्या' कुत्र्याचा फोटो डोनाल्ड ट्रम्पकडून ट्विट

Next

वॉशिंग्टनः आयएसआयएसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादीचा शनिवारी खात्मा करण्यात आला. बगदादीला मारण्यासाठी सीरियातील त्याच्या महत्त्वाच्या ठिकाणांना अमेरिकन लष्करानं लक्ष्य केलं होतं. आता या मोहिमेतील एका कुत्र्याचा फोटो डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केला आहे. त्यांनी कुत्र्याचं नाव उघड केलं नसलं तरी बगदादीला मारण्याच्या महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या कुत्र्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत. तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं होतं की, उत्तर सीरियातल्या एका भूमिगत सुरूंगमध्ये इसिसचा म्होरक्या बगदादीचा पाठल करताना अमेरिकी लष्करातील एक कुत्रा जखमी झाला आहे. आमच्या के 9 श्वान पथकातील सुंदर आणि प्रतिभावान कुत्रा  जखमी झाला आहे. 

'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया' अर्थात आयसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याला ठार करण्यात आले आहे. त्याच्यासोबत तीन मुले आणि इतर सहकाऱ्यांचा सुद्धा खात्मा करण्यात आला आहे. या वृत्ताला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुजोरा दिला आहे. अबू बक्र अल-बगदादी याचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने मोठी मोहीम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान अमेरिकेने भूसुरुंगात अबू बक्र अल-बगदादी याला ठार केले आहे.

याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, "काल रात्री अमेरिकेने जगातील पहिल्या क्रमांकाच्या दहशतवादी म्होरक्याला न्यायासमोर आणले. अबू बक्र अल-बगदादी ठार झाला आहे. जगातील सर्वात निर्दयी आणि हिंसक दहशतवादी संघटना असलेल्या आयसिसचा तो संस्थापक आणि म्होरक्या होता."
दरम्यान, एप्रिलमध्ये आयसिसने अबू बक्र अल-बगदादीचा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. पाच वर्षात प्रथमच आयसिसने अबू बक्र अल-बगदादीचा व्हिडीओ जारी केला होता. मात्र तो व्हिडीओ नेमका कधी चित्रित करण्यात आला, हे स्पष्ट होऊ शकले नव्हते. या व्हिडीओत त्यानं पूर्व सीरियातल्या आयसिसचा शेवटच्या बालेकिल्ला असलेल्या बागूजमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा उल्लेख केला होता.

Web Title: abu bakr al baghdadi death donald trump releases photo of military dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.