Afghanistan Crisis: पंजशीरमध्ये भीषण नरसंहाराची भीती, अडीच लाख लोकांचे जीव धोक्यात, अमरुल्लाह सालेह यांनी संयुक्त राष्ट्रांकडे केली मदतीची याचना 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 01:18 PM2021-09-05T13:18:21+5:302021-09-05T13:19:40+5:30

Afghanistan Crisis: काबुल आणि इतर शहरांचा पाडाव झाल्यानंतर पंजशीरमध्ये पोहोचलेले, स्थानिक महिला, मुले, वयस्कर आणि १० हजार आयडीपीसह सुमारे २ लाख ५० हजार लोक या खोऱ्यांमध्ये अडकले आहेत.

Afghanistan Crisis: Amid fears of genocide in Panjshir, 2.5 lakh lives in danger, Amarullah Saleh appeals to UN for help | Afghanistan Crisis: पंजशीरमध्ये भीषण नरसंहाराची भीती, अडीच लाख लोकांचे जीव धोक्यात, अमरुल्लाह सालेह यांनी संयुक्त राष्ट्रांकडे केली मदतीची याचना 

Afghanistan Crisis: पंजशीरमध्ये भीषण नरसंहाराची भीती, अडीच लाख लोकांचे जीव धोक्यात, अमरुल्लाह सालेह यांनी संयुक्त राष्ट्रांकडे केली मदतीची याचना 

Next

काबुल  - तालिबाननेअफगाणिस्तानवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. आता तिथे सरकार स्थापन करण्यासाठी तालिबानची धावपळ सुरू आहे. दरम्यान, पंजशीरवर तालिबानचा कब्जा अद्याप होऊ शकलेला नाही. (Afghanistan Crisis) तिथे अद्यापही भीषण लढाई सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे कार्यकारी राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह हे तालिबानला सातत्याने आव्हान देत आहेत. तसेच यादरम्यान त्यांनी मानवीय संकटाचा हवाला देऊन संयुक्त राष्ट्रांना पत्र लिहून मदतीसाठी याचना केली आहे. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहायता संस्थांकडे कट्टरपंथीयांकडून सुरू करण्यात आलेल्या युद्ध गुन्ह्यांना संपुष्टात आणण्यासाठी त्वरित साधनसामुग्री गोळा करण्याचे आवाहन केले आहे. (Amid fears of genocide in Panjshir, 2.5 lakh lives in danger, Amarullah Saleh appeals to UN for help)

पंजशीरमध्ये तालिबान आणि सुरक्षा दलांमध्ये तुंबळ लढाई सुरू आहे. तालिबानने पंजरीश प्रांतामध्ये सुरू असलेल्या लढाईमध्ये आघाडी घेतल्याच्या आनंदामध्ये शुक्रवारी आनंद साजरा करताना काबुलमध्ये गोळीबार केला होता. यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला होता. तर इतर ४१ जण जखमी झाले होते. पंजशीर अजूनही तालिबानच्या नियंत्रणाखाली आलेले नाही.

संयुक्त राष्ट्रांना लिहिलेल्या पत्रामध्ये अमरुल्लाह सालेह म्हणतात की, काबुल आणि इतर शहरांचा पाडाव झाल्यानंतर पंजशीरमध्ये पोहोचलेले, स्थानिक महिला, मुले, वयस्कर आणि १० हजार आयडीपीसह सुमारे २ लाख ५० हजार लोक या खोऱ्यांमध्ये अडकले आहेत. ते लढाईच्या दुष्परिणामांचा सामना करत आहेत. जर या परिस्थितीवर लक्ष दिल्यास मोठ्या प्रमाणावर उपासमार आणि नरसंहाराचा धोका आहे.

आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मगतीची मागणी करताना सालेह यांनी सांगितले की, दोन दशकांचा संघर्ष वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, साथींचा प्रकोप आमि कोविड-१९ची साथ आणि तालिबानकडून देशातील मोठ्या भूभागावर झालेला कब्जा यामुळे अफगाणिस्तान जगातील सर्वात वाईट मानवी संकटात सापडला आहे. आम्ही संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडे पंजशीर प्रांतामध्ये तालिबानच्या हल्ल्याला रोखण्यासाठी शक्य तितक्या प्रयत्नांचे आवाहन करत आहोत.

तालिबानशी लढत असलेल्या योध्यांच्या मुख्यालयामधील सूत्रांनी सांगितले की, अन्नपदार्थांच्या पुरवठ्यामध्ये कपात झाली आहे. तसेच तालिबान रुग्णालयाच्या आपातकालीन सेवांसाठीची सर्व वैद्यकीय मदत थांबवत आहे. हे क्षेत्र तालिबानच्या कब्जामध्ये येण्याच्या वृत्तादरम्यान, सालेह यांनी आधी सांगितले की, ते पंजशीर खोऱ्यातच आहेत. तसेच देश सोडून गेलेले नाहीत. 

Web Title: Afghanistan Crisis: Amid fears of genocide in Panjshir, 2.5 lakh lives in danger, Amarullah Saleh appeals to UN for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.