IAS Success Story: वडिलांनी घर विकून UPSC च्या तयारीसाठी पाठवलं; पहिल्या प्रयत्नात प्रदीप झाला IRS, नंतर बनला IAS 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 10:30 AM2021-03-30T10:30:46+5:302021-03-30T10:32:26+5:30

UPSC परीक्षांमध्ये अनेकदा उमेदवाराला पहिल्या प्रयत्नात यश मिळतं. परंतु IAS अधिकारी होण्यासाठी ते पुन्हाही प्रयत्न करताना दिसतात.

ias success story father sold house and sent pradeep to delhi to prepare for upsc became irs then ias officer | IAS Success Story: वडिलांनी घर विकून UPSC च्या तयारीसाठी पाठवलं; पहिल्या प्रयत्नात प्रदीप झाला IRS, नंतर बनला IAS 

IAS Success Story: वडिलांनी घर विकून UPSC च्या तयारीसाठी पाठवलं; पहिल्या प्रयत्नात प्रदीप झाला IRS, नंतर बनला IAS 

Next
ठळक मुद्देप्रदीपच्या युपीएससीच्या स्वप्नासाठी वडिलांनी विकलं होतं घरपहिल्या प्रयत्नात झाला आयआरएस, दुसऱ्या प्रयत्नात झाला आयएएस

Success Story Of IAS Topper Pradeep Singh: २०१९ मध्ये पार पडलेल्या युपीएससीच्या परीक्षांमध्ये संपूर्ण भारतातून २६ वा क्रमांक पटकावलेल्या प्रदीप सिंह यांची गोष्ट नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. प्रदीपच्या वडिलांनी त्याच्या युपीएससीच्या तयारीसाठी आपलं घर विकलं आणि त्याला दिल्लीला पाठवलं होतं. प्रदीपनं जवळपास दीड वर्ष दिवसरात्र एक करून या परीक्षेची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्णही झाला. परंतु रँकनुसार त्याला आयआरएस सेवा मिळाली. लहानपणापासूनच प्रदीपचं स्वप्न एक आयएएस अधिकारी बनण्याचं होतं. म्हणूनच त्यानं दुसरा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याचा संपूर्ण भारतातून २६ वा क्रमांक आला आणि त्याचं स्वप्न पूर्ण झालं.

प्रदीप मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा आणि लहानपणापासूनच अभ्यासातही हुशार. याचमुळे त्याच्या कुटुंबीयांना त्याला युपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घरातील आर्थिक परिस्थिती तितकी चांगली नव्हती. यासाठीच प्रदीपनं पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. दिवसरात्र मेहनत करून त्यांनं पहिल्याच प्रयत्नात यशही मिळवलं.

पहिल्यापासूनच एक रणनिती आखून आपण या परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय प्रदीपनं घेतला होता. याप्रकारे त्यानं आपल्या परीक्षेची तयारी सुरू केली. दीड वर्षांच्या अथक मेहनतीनंतर त्यानं आपली पहिली परीक्षा दिली आणि त्याच परीक्षेत त्याला यशही मिळालं. त्याच्या रँकनुसार त्याची निवड आयआरएस सेवेसाठी करण्यात आली. परंतु त्याच्या मनात आयएएसचं स्वप्न होतं. म्हणून त्यानं दुसऱ्यांदा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यातही त्याला यश मिळालं.

उमेदवारांना सल्ला

प्रदीपनं नॉलेज ट्रॅकला दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी उलगडा केला आहे. त्यानं युपीएससी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोलाचा सल्लाही दिला आहे. युपीएससीमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला धैर्यानं सतत मेहनत करावी लागेल. या परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हाला एक रणनिती तयार करणं आवश्यक आहे आणि त्याचीच अंमलबजावणी करून तुम्ही यश मिळवू शकता. अनेकदा आपल्याला यात अपयशही येतं. परंतु त्यातून निराश होण्याची गरज नाही. कठोर मेहनत ही तुम्हाला एक दिवस यश मिळवूनच देईल, असा सल्लाही त्यानं दिला आहे. 

Web Title: ias success story father sold house and sent pradeep to delhi to prepare for upsc became irs then ias officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.