An unprecedented response to Aviation and Gaming Advance booking, crashed website! | ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला अभूतपूर्व प्रतिसाद, वेबसाईट झाल्या क्रॅश!!
‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला अभूतपूर्व प्रतिसाद, वेबसाईट झाल्या क्रॅश!!

ठळक मुद्देचीन व आॅस्ट्रेलियामध्ये येत्या २४ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. तर अमेरिेकेत २५ एप्रिल आणि भारतात २६ एप्रिलला बॉक्सआॅफिसवर झळकणार आहे.

आर्यन मॅन, कॅप्टन अमेरिका, थॉर आणि हल्क यासारख्या ३२ सुपरहिरोंच्या करामती आणि थराराने सजलेला मार्वेल स्टुडिओचा ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. साहजिकच प्रेक्षकांची उत्सुकता लपलेली नाही. ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’च्या रिलीजपूर्वीच जगभरातील चाहते क्रेजी झाले आहेत. परिणामी चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. इतका की, ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’च्या आॅनलाईन बुकिंग साईट क्रॅश झाल्या आहेत.
फँडागो आणि अ‍ॅटम या आॅनलाईन तिकिट विक्री करणाऱ्या संकेतस्थळावर ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’चे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरु झाले आणि क्षणभरात या संकेतस्थळावर लोक अक्षरश: तुटून पडले. जगभरातील चाहते एकाचवेळी संकेतस्थळावर आल्याने ही दोन्ही संकेतस्थळे क्रॅश झालीत. ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’च्या एका तिकिटासाठी ५०० डॉलर म्हणजे सहा हजार रूपये मोजावे लागूनही प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल कमालीचा उत्साह पाहायला मिळाला.


याआधी स्टार वॉर्स फ्रेंचाइजीच्या ‘स्टार वॉर्स- द फोर्स अवेकन्स’ आणि ‘स्टार्स वॉर्स- द लास्ट लेडी’ या दोन हॉलिवूड चित्रपटांच्या तिकिट विक्रीला असाच अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी तिकिट विक्री करणारी संकेतस्थळे क्रॅश झाली होती. पण ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ने हा विक्रमही तोडला.


‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा मार्वेलचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठ्या लांबीचा चित्रपट असणार आहे. हा चित्रपट ३ तास २ मिनिटांचा असेल. या चित्रपटात मार्वेल सीरिजच्या २२ चित्रपटांचे सुपरहिरो एकत्र दिसणार आहेत. भारतातही या चित्रपटाबद्दल कमालीचा उत्साह पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचा उत्साह बघता ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा वर्ल्ड वाईड बॉक्सआॅफिसवर एक इतिहास रचेल, असे मानले जात आहे. चीन व आॅस्ट्रेलियामध्ये येत्या २४ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. तर अमेरिेकेत २५ एप्रिल आणि भारतात २६ एप्रिलला बॉक्सआॅफिसवर झळकणार आहे.


Web Title:  An unprecedented response to Aviation and Gaming Advance booking, crashed website!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.