‘ब्लॅक विडो’ स्कारलेट जोहानसनने तिसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, कॉलिन जोस्टसोबत गुपचूप उरकले लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 12:33 PM2020-10-30T12:33:30+5:302020-10-30T12:36:17+5:30

2017 पासून दोघेही एकमेकांना डेट करत होते. 2006 साली दोघे पहिल्यांदा भेटले होते.

scarlett johansson and colin jost got married in an intimate ceremony last weekend | ‘ब्लॅक विडो’ स्कारलेट जोहानसनने तिसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, कॉलिन जोस्टसोबत गुपचूप उरकले लग्न

‘ब्लॅक विडो’ स्कारलेट जोहानसनने तिसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, कॉलिन जोस्टसोबत गुपचूप उरकले लग्न

googlenewsNext
ठळक मुद्दे स्कारलेट जोहानसन ही अमेरिकन अभिनेत्री आहे. 2015 - 2016  साली सर्वाधिक मानधन घेणा-या अभिनेत्रीच्या यादीत तिचे स्थान होते.

‘अ‍ॅव्हेंजर्स’ फेम हॉलिवूड अभिनेत्री स्कारलेट जोहानसन सध्या तिस-या लग्नामुळे चर्चेत आहे. 35 वर्षांच्या स्कारलेटने अमेरिकन कॉमेडियन कॉलिन जोस्टसोबत गुपचूप लग्नगाठ बांधल्याचे मानले जात आहे. अर्थात अद्याप तिने याबाबत कुठलीही घोषणा केलेली नाही.
गेल्याच आठवड्यात स्कारलेट व कॉलिन यांनी लग्न केल्याचे कळते. 2017 पासून दोघेही एकमेकांना डेट करत होते. 2006 साली दोघे पहिल्यांदा भेटले होते.

Meals on Wheels च्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर स्कारलेटच्या लग्नाची घोषणा करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये शिपचा फोटो शेअर करण्यात आला आहे. यावर ‘जोस्ट मॅरिड’ असे लिहिलेले आहे. या पोस्टनंतर चाहत्यांनी या कपलवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केलाय.

2008 साली स्कारलेटने कॅनडाच्या रायन रेनल्ड्जसोबत लग्न केले होते. हे लग्न केवळ 3 वर्षे टिकले. 2011 मध्ये स्कारलेट व रायन यांनी घटस्फोट घेतला होता. 2014 मध्ये स्कारलेटच्या आयुष्यात Romain Dauriacची एन्ट्री झाली. तीनच वर्षात स्कारलेटचा हा दुसरा संसारही मोडला. 2017 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला. दुस-या पतीपासून स्कारलेटला एक मुलगा आहे. आता स्कारलेटने तिसºयांदा संसार थाटला आहे.

स्कारलेट जोहानसन ही अमेरिकन अभिनेत्री आहे. 2015 - 2016  साली सर्वाधिक मानधन घेणा-या अभिनेत्रीच्या यादीत तिचे स्थान होते. वयाच्या उण्यापु-या 9 व्या वर्षी तिने करिअरला सुरुवात केली. 1994 साली प्रदर्शित झालेला ‘नॉर्थ’ हा तिचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर तिला ‘मॅनी अँड लो’ या चित्रपटातील अभिनयासाठी ‘इंडिपेंडंट स्पिरिट अवॉर्ड फॉर बेस्ट फीमेल लीड या पुरस्काराकरिता नामांकित करण्यात आले. ‘द हॉर्स व्हिस्परर’ व ‘घोस्ट वर्ल्ड’  या चित्रापटांतील अभिनयाने स्कारलेट अधिकच प्रकाशझोतात आली. स्कारलेटने ‘अ‍ॅव्हेंजर्स’ सीरिजमध्ये ब्लॅक विडोचे पात्र साकारले होते. पुढे याच नावाने तिला ओळखले जाऊ लागले.

Web Title: scarlett johansson and colin jost got married in an intimate ceremony last weekend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.