prince harry announced meghan markle give birth to baby boy | ब्रिटनच्या शाही कुटुंबात आला नवा पाहुणा, मेगन मार्कलने दिला मुलाला जन्म!
ब्रिटनच्या शाही कुटुंबात आला नवा पाहुणा, मेगन मार्कलने दिला मुलाला जन्म!

ठळक मुद्देमेगन मार्कल हॉलिवूडची अभिनेत्री होती. गत मे महिन्यात प्रिन्स हॅरी व मेगन मार्कल लग्नबंधनात अडकले होते.

 ब्रिटनचा ड्यूक ऑफ डचेस ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कल यांच्या घरी पुत्ररत्न जन्मास आले आहे. शाही कुटुंबाने याबाबतची अधिकृत घोषणा केली. शाही कुटुंबातील या तान्हुल्या राजकुमाराचे नाव काय ठेवले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  उद्या बुधवारी या तान्हुल्याची पहिली झलक अर्थात त्याचा फोटो लोकांना पाहायला मिळू शकतो. याचदिवशी त्याचे नावही उघड केले जाऊ शकते.
  प्रिन्स हॅरीने बाळाच्या जन्माची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली. ‘मी आणि मेगन आम्ही दोघेही बाळाच्या जन्माने खूप आनंदी आहोत. मेगन आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत. हा एक खास क्षण आहे,’ असे त्यांनी सांगितले.


गतवर्षी १९ मे रोजी प्रिन्स हॅरी व मेगन यांचा शाही विवाह पार पडला होता. या शाही लग्नामध्ये सुमारे ८४ मिलियन पाउंड (७८७ कोटी रुपये) खर्च केले गेले होते. लग्नापूर्वी प्रिन्स हॅरीला ड्यूक ऑफ ससेक्स या उपमेने गौरविले गेले होते. तसेच,    मेगनला  डचेज  ऑफ ससेक्स  ही उपमा दिली गेली होती.

४ आॅगस्ट १९८१ मध्ये जन्मलेली मेगन मार्कल हॉलिवूडची अभिनेत्री होती. गत मे महिन्यात प्रिन्स हॅरी व मेगन मार्कल लग्नबंधनात अडकले होते. प्रिन्स हॅरीसोबत मेगनचे दुसरे लग्न आहे. हॉलिवूडची अभिनेत्री मेगन मार्कल घटस्फोटित असून अमेरिकन टीव्ही मालिका सुट्समध्ये तीने प्रमुख भुमिका साकारली होती.  २०११मध्ये तिने अमेरिकन निर्माता ट्रेवर एंजलसनसोबत लग्न केले होते. मात्र, २०१३मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. प्रिन्स हॅरी आणि मेगनची भेट २०१६ मध्ये एका मित्राच्या घरी झाली होती. प्रिन्स हॅरी ३३ वर्षांचा असून मेगन ३६ वर्षांची आहे. प्रिन्स हॅरी हा इंग्लडची राणी एलिझाबेथ द्वितीयचा नातू आणि वेल्सचे राजकुमार चार्ल्स आणि डायना यांचा लहान मुलगा आहे.

English summary :
Britain's Duke of Duchess of Sussex Prince Harry and Hollywood actress Megan Markle gave birth to baby boy. The Royal Family announced this as an official announcement. On May 19, Prince Harry and Megan had a royal wedding. In this royal wedding, about 84 million pounds (787 crores) were spent.


Web Title: prince harry announced meghan markle give birth to baby boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.