नितीन वाकणकर डीएव्हीपीचे नवे महासंचालक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 05:11 AM2020-03-18T05:11:48+5:302020-03-18T05:12:21+5:30

भारतीय माहिती सेवेत असताना वाकणकर यांनी दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे कलाम व माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचेही माध्यम सचिव होते.

Nitin Wakankar new DAVP Director General | नितीन वाकणकर डीएव्हीपीचे नवे महासंचालक

नितीन वाकणकर डीएव्हीपीचे नवे महासंचालक

googlenewsNext

नवी दिल्ली : सीबीआयच्या प्रवक्तेपदावर छाप उमटवणारे मराठी अधिकारी नितीन वाकणकर यांची ब्युरो आॅफ आऊटरिच अँड कम्युनिकेशनच्या (डीएव्हीपी) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सीबीआयच्या प्रतिमेचा नकारात्मक प्रसार रोखण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती.
सीबीआय संचालक आर. के. शुक्ला यांच्याशी सल्लामसलत करून वाकणकर यांनी प्रसारमाध्यमांमध्ये सीबीआयची प्रतिमा बदलण्याचे प्रयत्न केले.
तत्कालीन संचालक आलोक वर्मा व विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील वादामुळे सीबीआयमधील धुसफूस उघड झाली होती.
भारतीय माहिती सेवेत असताना वाकणकर यांनी दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे कलाम व माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचेही माध्यम सचिव होते. दिवंगत माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या मंत्रालयातही त्यांनी माहिती व प्रचार विभागाची धुरा सांभाळली होती.

Web Title: Nitin Wakankar new DAVP Director General

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.