प्रियांका चोप्रानिक जोनास यांनी जोधपूरच्या उमेद भवन येथे थाटामाटात लग्न केले. यावेळी अख्खे जोनास कुटुंब हजर होते. जोनास कुटुंबाने हे लग्न अगदी मनापासून एन्जॉय केले. निकनंतर जोनास कुटुंबात पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार आहेत. होय, प्रियांका व निकच्या लग्नानंतर  निकचा मोठा भाऊ जो जोनास हाही हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोफी टर्नरसोबत लग्नगाठ बांधणार आहे. होय, येत्या नव्या वर्षात दोघेही लग्न करणार आहेत. हे लग्न फ्रान्समध्ये हाईल, असे कळतेय. आॅक्टोबर २०१७ मध्ये जो आणि सोफी यांनी एंगेजमेंट केली होती.


जो जोनास हा निकपेक्षा ३ वर्षांनी मोठा आहे. सोफीबद्दल सांगायचे तर अमेरिकन टीव्ही सीरिज ‘गेम आॅफ थ्रोन्स’मध्ये ती दिसली होती. ही सीरिज प्रचंड लोकप्रीय ठरली होती. 


प्रियांका व निकच्या लग्नात जो आणि सोफी दोघेही हजर होते. यादरम्यानच्या अनेक कार्यक्रमात सोफीचा पारंपरिक लूक चांगलाच चर्चेत राहिला. प्रियांकाच्या संगीत सेरेमनीत सोफीने खास परफॉर्मन्स दिला. त्याचीही चांगली चर्चा झाली. 

गत १ डिसेंबरला प्रियांका व निक दोघेही ख्रिश्चन पद्धतीने लग्नबेडीत अडकले. यानंतर २ डिसेंबरला दोघांनीही हिंदू पद्धतीने लग्नगाठ बांधली. प्रियांका व निकच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतूर होते. पण या लग्नाचा एकही फोटो समोर आला नाही. 

English summary :
Joe Jonas And Sophie Turner Wedding: Nick elder brother Joe Jonas will soon get married to Hollywood's famous actress Sophie Turner. Yes, the couple will be getting married in the upcoming year. This wedding will held in France. Joe and Sophie had an engagement in October 2017.


Web Title: nick jonas brother joe jonas and sophie turner getting married in 2019 in france

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.