nick jonas brother joe and sofie turner got married in america | प्रियंका चोप्राचा दीर जो जोनासचे सरप्राईज वेडिंग, सोफी टर्नरसोबत अडकला लग्नबंधनात
प्रियंका चोप्राचा दीर जो जोनासचे सरप्राईज वेडिंग, सोफी टर्नरसोबत अडकला लग्नबंधनात

ठळक मुद्देजो आणि सोफी २०१६ पासून एकमेकांना डेट करत होते. २०१७ मध्ये दोघांनी साखरपुडा केला होता.

प्रियंका चोप्राचा दीर आणि निक जोनसचा भाऊ जो जोनस आणि ‘गेम आॅफ थ्रोन्स’ची अभिनेत्री सोफी टर्नर हे कपल लग्न करणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. पण हे लग्न इतक्या आश्चर्यकारक पद्धतीने होईल, याची कुणीही कल्पना केली नव्हती. होय, बुधवारी १ मे रोजी जो आणि सोफी लास वेगासमध्ये जो आणि सोफी यांची सरप्राईज वेडिंग सेरेमनी पार पडली.
खरे तर बिलबोर्ड म्युझिक अवार्डसाठी जो व सोफी लास वेगासमध्ये आले होते.  या म्युझिक अवार्ड इव्हेंटमध्ये जोने परफॉर्मन्स केला आणि यानंतर   एका सरप्राइज वेडिंग सेरेमनीमध्ये थेट सोफीसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
डीजे डिप्लोने या लग्नाचा एक व्हिडीओ शेअर केला. यात सोफी वेडिंग गाऊनमध्ये दिसतेय  तर जोनस ब्रदर्सने करड्या रंगाचा सूट घातला आहे. एंटरटेनमेंट टुनाईटने दिलेल्या वृत्तानुसार, जो आणि सोफी यांनी आधीच मॅरेज लायसन्स घेतले होते. जोने अलीकडे एका टीव्ही शोदरम्यान आपल्या लग्नाबद्दल संकेत दिले होते. याचवर्षी उन्हाळ्यात हे लग्न होणार, असे त्याने सांगितले होते. या लग्नानंतर जो आणि सोफी लवकरच लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन देणार, असे मानले जात आहे.
जो आणि सोफी २०१६ पासून एकमेकांना डेट करत होते. २०१७ मध्ये दोघांनी साखरपुडा केला होता. निक आणि प्रियंकाच्या लग्नातही हे दोघे हजर होते. प्रियंका आणि निकनंतर जो आणि सोफी यांच्या लग्नाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.


Web Title: nick jonas brother joe and sofie turner got married in america
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.