miss peru 2019 anyella grados drunk vomiting video trouble stripped of her crown | दारू पिणे पडले महागात! गमवावा लागला ‘मिस पेरू’चा ताज!!
दारू पिणे पडले महागात! गमवावा लागला ‘मिस पेरू’चा ताज!!

मिस पेरू एनयेला ग्रादोस हिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि एनयेलाला ‘मिस पेरू’चा ताज गमवावा लागला. होय, एनयेलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओत ती दारू पिऊन ओकारी करताना दिसतेय. एनयेलाच्या या व्हिडीओने एकच खळबळ माजली आणि गत बुधवारी तिच्याकडून तिचा ‘मिस पेरू 2019’चा किताब काढून घेण्यात आला.


पेरूच्या एका नाईटक्लबमध्ये 20 वर्षांच्या एनयेलाने मद्यप्राशन केले. पण एका पाठोपाठ एक अनेक पेग पोटात गेल्यावर नको तेच झाले. पोटात रिचवलेली सगळी दारू बाहेर आली. इतकी की, हॉटेलच्या रूमच्या बेडवर बसून एनयेला जमिनीवर ओकाºया करू लागली. यानंतर अचानक ओकारी करतानाचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ ‘मिस टीन पेरू 2018’ केमिला कनिकूबाने रेकॉर्ड केला होता. एनयेला भानावर आली तोपर्यंत व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर लगेच तिला ‘मिस पेरू’चा ताज गमवावा लागला. आता एनयेलाला ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.


हा व्हिडीओ रेकॉर्ड करणा-या केमिलाचे मानाल तर एनयेलाचा व्हिडीओ व्हायरल करण्याचा तिचा कुठलाही उद्देश नव्हता. चुकून तिच्या हातून हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाला. इकडे एनयेला यामुळे चांगलीच खवळली. माझ्या परवानगीशिवाय व्हिडीओ रेकॉर्ड करणाºयांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इरादा तिने बोलून दाखवला


Web Title: miss peru 2019 anyella grados drunk vomiting video trouble stripped of her crown
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.