ठळक मुद्देमाइली एक गायिका, अभिनेत्री व लेखिका आहे. २००७ मध्ये तिने ‘मीट माइली सायरस’ या अल्बमसह म्युझिक करिअरची सुरुवात केली

हॉलिवूड अभिनेत्री व गायिका माइली सायरस हिला अलीकडे एका माथेफिरू चाहत्याचा सामना करावा लागला. अलीकडे माइली स्पेनच्या बार्सिलोना शहरात पोहोचली. या शहरात एका हॉटेलमध्ये माइलीचा मुक्काम होता. हॉटेलमधून पती लियाम हेम्सवर्थ याच्यासोबत बाहेर पडत असताना माइलीला गर्दीने घेरले. याचदरम्यान एक चाहता समोर आला आणि त्याने माइलीला बळजबरीने पकडून तिचे चुंबन घेतले.


प्राप्त माहितीनुसार, माइली एका परफॉर्मन्ससाठी बार्सिलोना येथे आली होती. रविवारी हॉटेलबाहेर पडताच लोकांनी तिलाा घेराव घातला. माइली पती आणि सुरक्षा रक्षकांच्या मदतीने गर्दीतून बाहेर पडत असताना एकजण आला आणि त्याने माइलीच्या केसांना पकडत तिला आपल्याकडे ओढले व तिचे चुंबन घेतले. माइलीने या व्यक्तिला धक्का देत, त्याला स्वत:पासून दूर केले.


या घटनेचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी माइलीसोबत गैरवर्तन करणाऱ्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. अनेकांनी माइलीला सतर्क राहण्याचा तसेच सुरक्षा वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

माइली एक गायिका, अभिनेत्री व लेखिका आहे. २००७ मध्ये तिने ‘मीट माइली सायरस’ या अल्बमसह म्युझिक करिअरची सुरुवात केली. २००८ मध्ये ‘बोल्ट’ नामक चित्रपटात ती झकळली. डिज्नीच्या ‘हेना मॉन्टेना’ शृंखलेतील तिची व्यक्तिरेखा प्रचंड गाजली.


Web Title: Miley Cyrus forcibly kissed, groped by fan during Barcelona trip with Liam Hemsworth
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.