mexican kim kardashian joselyn cano dies following a botched butt lift surgery | सर्जरी केली अन् जीवानिशी गेली...! मॅक्सिकोची ‘किम कर्दाशियन’ जोसलीन कॅनोचा 29 व्या वर्षी मृत्यू

सर्जरी केली अन् जीवानिशी गेली...! मॅक्सिकोची ‘किम कर्दाशियन’ जोसलीन कॅनोचा 29 व्या वर्षी मृत्यू

ठळक मुद्दे करोनामुळे  मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत जोसेलिनवर अंत्यसंस्कार करण्यात आले.  

अमेरिकेची मॉडेल व फॅशन डिझाईनर जोसलीन कॅनो हिला उण्यापु-या 29 व्या वर्षी जीव गमवावा लागला. सुंदर, सुडौल दिसण्यासाठी तिने बट-लिफ्ट सर्जरी केली आणि हीच सर्जरी तिच्या मृत्यूचे कारण ठरली. जोसलीन कॅनो ही मॉडेलिंग जगातील मोठे नाव होते. मॅक्सिकोची ‘किम कर्दाशियन’ म्हणून ती ओळखली जायची. गेल्या 7 डिसेंबरला तिला मृत्यू झाला.
जोसलीन केवळ 29 वर्षांची होती. 14 मार्च 1990 रोजी जन्मलेल्या जोसलीनने 17 व्या वर्षीच मॉडेलिंग सुरु केले होते. ग्लॅमरस स्टाईल आणि लुकमुळे तिला मॅक्सिकोची ‘किम कर्दाशियन’ म्हणून ओळखले जायचे. 

 

मिररने दिलेल्या वृत्तानुसार बट-लिफ्ट सर्जरीसाठी जोसलीन कोलंबियाला गेली होती. मात्र, सर्जरी बिघडल्याने तिचा मृत्यू झाला. तथापि तिच्या कुटुंबियांकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही. कोलंबियातील न्यूपोर्ट बीचमधील एका रहिवाशाने तिच्या अंत्यसंस्काराचे यू ट्यूबवरून लाईव्ह केले. 

 करोनामुळे  मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत जोसेलिनवर अंत्यसंस्कार करण्यात आले.  सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी जोसलीनने याआधीही अनेक शस्त्रक्रिया केल्या होत्या. मात्र बट लिफ्ट सर्जरी तिच्या जीवावर बेतली. तिच्या मृत्यूमुळे तिच्या चाहत्यांना प्रचंड मोठा धक्का बसला आहे. इन्स्टावर तिचे 13 मिलियन फॉलोअर्स होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mexican kim kardashian joselyn cano dies following a botched butt lift surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.