अमेरिकन सिंगर केटी पेरी सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंड होते आहे. या मागचे कारण न्यूयॉर्कमध्ये नुकतेच पार पडलेल्या मेट गालातील केटीचा लूक आहे. या इव्हेंटमध्ये युनिक फॅशन ट्रेंड पहायला मिळतो. मेट गालाच्या रेड कारपेटवर केटी पेरी लॅम्प ड्रेसमुळे खूप चर्चेत आली. पण, याहूनही सर्वात जास्त आकर्षक केटी पेरीचा बर्गर आऊटफिट होता.   

केटी पेरीने बर्गरसारखे आऊटफिट मेट गाला प्रोग्राममध्ये परिधान केला होता. केटी पेरीचा हा ड्रेस खूपच वेगळा आणि लक्षवेधी होता.

इंटरनेटवर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात केटी पेरी ड्रेस घालताना दिसते आहे. हा ड्रेस मधून ओपन आहे. फॅशन आयकॉन केटी पेरी दरवर्षी प्रमाणे यंदादेखील सुपरहिट ठरली. मेट गालामधील बर्गर व लॅम्प ड्रेस दोन्ही लूक खूप हिट ठरले.


बर्गर ड्रेससोबतच केटी पेरीचा शूज युनिक अंदाजात डिझाईन केले आहेत. शूजचा रंग व लूकदेखील बर्गरसारखाच होता. शूजचा फोटो केटी पेरीने ट्विटरवर शेअर केला आहे. तिचा लूक जेरेमी स्कॉटने डिझाईन केला आहे.


यंदाच्या ‘मेट गाला 2019’ची थीम ‘कॅम्प: नोट्स ऑन फॅशन’ होती. कॅम्पचा अर्थ, एक असे ट्रॉन्सफॉर्मेशन, ज्यातून प्रत्येक व्यक्तिने गेले पाहिजे. 


केटी पेरी प्रमाणेच किम कार्दशियन, प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोण, निक जोनास, सोफी टर्नर जोनास, केली आणि केल्डल जेनर, सेरेना विलियम्स यांसारख्या अनेक सेलिब्रेटींनी मेट गाला 2019 मध्ये हजेरी लावली आणि आपल्या स्टाईल स्टेटमेंटने लोकांची मने जिंकली. 


Web Title: met-gala-2019-katy-perry-burger-attire-shocked-everyone-after-outrageous-chandelier-outfit-
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.