हॉलिवूडचे सर्वात क्यूट व चर्चित जोडींपैकी अभिनेत्री माइली सायरस व अभिनेता लिएम हेम्सवर्थने लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्याच्या आधीचं विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

एका अमेरिकी रिपोर्टनुसार, माइली व लिएम यांनी एकमेकांच्या सहमतीनं विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण दोघांनाही करियरमध्ये लक्ष केंद्रीत करायचं आहे. माइली व लिएम २०१८मध्ये लग्नबेडीत अडकले होते. लग्नाच्या आधी ते दोघे एकमेकांना दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून एकमेकांना ओळखत होते.


सायरसच्या निकटवर्ती सूत्रानं पीपल डॉट कॉमला सांगितलं की, लिएम व माइली या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दोघांना स्वतःवर व करियरवर जास्त लक्ष द्यायचं आहे. कृपया त्यांच्या निर्णयाचा आदर कराल. 


माईली सायरस सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ते इंस्टाग्रामवर तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.

माईली अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका आहे आणि तिच्या परफॉर्मन्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर बऱ्याचदा व्हायरल होत असतात. 


Web Title: Liam Hemsworth opened up about his split with Miley Cyrus
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.