शेवटची आंघोळ कधी केली आठवत नाही! या जगप्रसिद्ध अभिनेत्रीने केला अजब खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 11:29 AM2019-12-22T11:29:06+5:302019-12-22T11:30:25+5:30

होय, शेवटची आंघोळ कधी केली हे आठवत नसल्याचे म्हटले आहे.

lady gaga cant remember when she took a bath last time | शेवटची आंघोळ कधी केली आठवत नाही! या जगप्रसिद्ध अभिनेत्रीने केला अजब खुलासा!!

शेवटची आंघोळ कधी केली आठवत नाही! या जगप्रसिद्ध अभिनेत्रीने केला अजब खुलासा!!

googlenewsNext
ठळक मुद्देऑस्कर आणि गोल्डन ग्लोब सारख्या नामांकित पुरस्कारांवर नाव कोरणारी लेडी गागा जगातील सर्वोत्कृष्ट संगीतकांरांपैकी एक म्हणून ओळखली जाते.

हॉलिवूडची पॉप सिंगर आणि अ‍ॅक्ट्रेस लेडी गागा हिने काही दिवसांपूर्वी एक संस्कृत श्लोक पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधले होते. सध्या तिचे एक मजेशीर ट्विट इंटरनेटवर चर्चेचा विषय बनले आहे. होय, लेडी गागाने तिचा तिच्या पर्सनल असिस्टंटसोबत झालेला संवाद ट्विटरवर शेअर केला आहे. यात तिने शेवटची आंघोळ कधी केली हे आठवत नसल्याचे म्हटले आहे.




तू शेवटची आंघोळ कधी केली होतीस? असा प्रश्न लेडी गागाची पर्सनल असिस्टंट तिला विचारले. यावर मला आठवत नाही, असे उत्तर लेडी गागा देते.
 तिचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.



 

 लेडी गागाच्या या ट्विटनंतर चाहत्यांनीही मजेशीर कमेंट्स केल्या आहे. आंघोळ न करणा-यांची राणी... LG6 फिजिकल अल्बम शरीराच्या दुर्गंधीने भरलेला असेल... असे फनी ट्विट  एका युजरने केले आहे. तर अन्य काही जणांनी यावर भन्नाट मीम्स शेअर केले आहेत.




लेडी गागा सध्या  LG6 या आगामी अल्बममध्ये बिझी आहे. आपल्या ट्विटमध्येही तिने या अल्बमचा उल्लेख केला आहे. या अल्बममध्ये मी इतके बिझी आहे की, मला आंघोळ करण्याचीही उसंत नाही, असे तिने सुचवले आहे.




ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब सारख्या नामांकित पुरस्कारांवर नाव कोरणारी लेडी गागा जगातील सर्वोत्कृष्ट संगीतकांरांपैकी एक म्हणून ओळखली जाते. संगीताबरोबरच गेल्या काही काळात तिने अभिनेत्री म्हणून सिनेसृष्टीतही नाव कमावले. काही दिवसांपूर्वी ती तिच्या प्रेग्नंसीच्या अफवांमुळे चर्चेत आहे. ‘अफवा आहे की मी प्रेग्नंट आहे. होय मी  LG6 मुळे प्रेग्नंट आहे,’ असे  ट्विट तिने केले होते.  LG6 हा लेडी गागाचा सहावा सोलो अल्बम आहे.  

Web Title: lady gaga cant remember when she took a bath last time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.