हॉलिवूडमधील प्रसिद्ध रिएलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियनची बहिण क्लोई कार्दशियन सध्या सिंगल मदर बनून आपल्या मुलीसोबत वेळ व्यतित करत आहे. तिचा एक्स नवरा लैमर जोसेफ ओडोमने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबतचा खुलासा नुकताच जोसेफने केला आहे. त्याने सांगितले की, त्यावेळी मी ड्रग्जच्या नशेत असल्यामुळे मला काहीच कळत नव्हते. त्याने हा खुलासा एका मुलाखतीत केला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका मुलाखतीत लैमरने त्या दिवसांची आठवण करीत सांगितले की, त्या दिवशी त्याने खूप ड्रग्स घेतले होते. त्यामुळे त्याचे स्वतःवर अजिबात संतुलन नव्हते. त्यावेळी क्लाईने त्याच्या मित्राला मदतीसाठी बोलवलो होते आणि ही गोष्ट लैमरला अजिबात आवडली नाही.


त्याचे मित्र आले तेव्हा लैमर नीट वागत होता. मात्र जसे ते लोक गेले त्याने क्लोईचा गळा पकडला आणि ओरडू लागला की माझ्या मित्रांसमोर माझा अपमान करण्याची हिम्मत कशी केलीस. त्यानंतर दोघांमध्ये खूप भांडणे झाली. इतकेच नाही लैमरने क्लोईला जीवे मारण्याची धमकीदेखील दिली. त्यानंतर लैमरने संपूर्ण घराची तोडफोड केली होती.


क्लोई आणि लैमर २०१६ मध्ये विभक्त झाले. ते दोघे २००९ साली लग्नबेडीत अडकले होते. क्लोई किम कार्दशियांची बहिण आहे.

काही दिवसांपूर्वी क्लोई बहिणींसोबत मियामी वेकेशन एन्जॉय करण्यासाठी गेली होती. या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.


Web Title: khloe-kardashian-ex-husband-reveals-that-he-gave-her-death-threat
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.