ठळक मुद्देरॉब गेल्या काही महिन्यांपासून किडनी आणि लिव्हरच्या आजाराने त्रस्त होता. त्यावर तो उपचार देखील घेत होता. पण शुक्रवारी वेस्ट वर्जिनिया येथील एका रुग्णालयात त्याने शेवटचा श्वास घेतला.

कराटे कीड या चित्रपटातील टॉमी या भूमिकेमुळे नावारूपाला आलेल्या रॉब गॅरीसनचे वयाच्या 59 व्या वर्षी निधन झाले. रॉबने कराटे कीड या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये देखील काम केले होते.

कराडे कीड या चित्रपटातील रॉबचा परफॉर्मन्स प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. कोबरा कायच्या दुसऱ्या सिझमध्ये प्रेक्षकांना त्याला शेवटचे पाहाण्यात आले होते. यातील त्याच्या भूमिकेचे देखील चांगलेच कौतुक झाले होते. रॉबला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याला त्याचे फॅन्स नक्कीच मिस करणार असे याहू एन्टरटेन्मेंटने दिलेल्या त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे. 

रॉबच्या मेहुणीने मीडियाशी बोलताना सांगितले की, रॉब गेल्या काही महिन्यांपासून किडनी आणि लिव्हरच्या आजाराने त्रस्त होता. त्यावर तो उपचार देखील घेत होता. पण शुक्रवारी वेस्ट वर्जिनिया येथील एका रुग्णालयात त्याने शेवटचा श्वास घेतला. वेस्ट वर्जिनिया हे त्याचे गाव होते. 

रॉबने सत्तरीच्या दशकातील प्रोम नाईट या हॉरर चित्रपटातील दोन्ही भागांमध्ये काम केले होते. तसेच 1980 मध्ये ब्रुडाकेरमध्ये देखील काम केले होते. त्यानंतर आयरन इगल या चित्रपटात तसेच मॅकगेव्हर, कोच यांसारख्या अनेक टिव्ही शोमध्ये तो झळकला. पण तरीही त्याला खरी प्रसिद्धी ही कराटे कीडमुळे मिळाली. रॉबच्या निधनानंतर सोशल मीडियाद्वारे अनेकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. कोबरा कायचे लेखक आणि निर्माते जॉन यांनी रॉबसोबतचा एक जुना फोटो पोस्ट करत त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे.  


Web Title: 'Karate Kid' actor Robert Garrison dies at 59
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.