कान्ये वेस्टने दिले किम कार्दिशियनला सर्वोत्तम बर्थडे गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2016 01:42 PM2016-10-22T13:42:02+5:302016-10-22T13:42:02+5:30

किम च्या वाढदिवसानिमित्त कान्येने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यामध्ये किमच्या बालपणातील आतापर्यंत कधीही न पाहिले गेलेले क्षणचित्रे आहेत.

Kanye West gave Kim Kardashian the best birthday gift | कान्ये वेस्टने दिले किम कार्दिशियनला सर्वोत्तम बर्थडे गिफ्ट

कान्ये वेस्टने दिले किम कार्दिशियनला सर्वोत्तम बर्थडे गिफ्ट

googlenewsNext
िलोकप्रिय दाम्पत्य किम कार्दिशियन आणि कान्ये वेस्ट एकमेकांना देणाºया भेटवस्तूंसाठी नेहमीच चर्चेत राहतात. पत्नीला खुश करण्यासाठी कान्येने तिच्या वाढदिवसासाठी यंदा खूप मेहनत घेतली असे म्हणावे लागेल.

किम कार्दिशियनच्या ३६व्या वाढदिवसानिमित्त कान्येने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यामध्ये किमच्या बालपणातील आतापर्यंत कधीही न पाहिले गेलेले क्षणचित्रे आहेत. ‘हॅपी बर्थडे बेब’ असे ट्विट करत त्याने हा व्हिडिओ मॉन्टाज शेअर केला.

किमचे तिच्या बहिणी व कुटुंबासमवेतचे फोटोच या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात. क्लो कार्दिशियन, कॉर्टनी कार्दिशियन, रॉब कार्दिशियन, आणि क्रिस जेनर यांच्यासोबतचे अनेक आतापर्यंत न पहिलेले फोटो चाहत्यांना बघायला मिळतात.

{{{{twitter_video_id####}}}}


आपल्या आवडीच्या सेलिब्रेटीच्या बालपणातील फोटो प्रथमच पाहायला मिळताहेत म्हटल्यावर इंटरनेटवर हा व्हिडिओ तुफान गाजतोय. जगप्रसिद्ध स्टार होण्याआधी किम कशी होती याची झलक यातून दिसतेय. इझीचे ‘ओन्ली वन’ हे गाणे व्हिडिओमध्ये वापरण्यात आले आहे.

किमच्या आईनेदेखील ट्विटकरून लाडक्या मुलीला शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले की, ‘किम आम्ही तुझ्याावर खूप प्रेम करतो. तुझ्यामुळे आमच्या जीवना आनंद आला आहे. तु एक आदर्श मुलगी, पत्नी, बहीण, मैत्रिण आणि आई आहेस. वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा.’

पॅरिस येथे झालेल्या चोरीच्या घटनेनंतर किम खूप अस्वस्थ होती. त्यामुळे तिच्या वाढदिवासाला काही तरी स्पेशल करण्यासाठी संपूर्ण कुटुंब तयारी करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असेच म्हणावे लागेल.

Web Title: Kanye West gave Kim Kardashian the best birthday gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.