जॉनी डेप करतोय आर्थिक चणचणीचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2017 05:13 PM2017-02-07T17:13:12+5:302017-02-07T22:43:12+5:30

पत्नी एम्बर हर्ड हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर एकापाठोपाठ एक अडचणींचा सामना करीत असलेला हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप सध्या प्रचंड आर्थिक ...

Johnny Depp is facing financial difficulties | जॉनी डेप करतोय आर्थिक चणचणीचा सामना

जॉनी डेप करतोय आर्थिक चणचणीचा सामना

googlenewsNext
्नी एम्बर हर्ड हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर एकापाठोपाठ एक अडचणींचा सामना करीत असलेला हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप सध्या प्रचंड आर्थिक चणचणीत सापडला आहे. त्यामुळे त्याने त्याच्या कर्मचाºयांची कपात करण्यास सुरुवात केली असून, जॉनीच्या या दशेवर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉनी आर्थिक अडचणीत असल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून त्याच्या कंपनीत काम करीत असलेल्या एजंटला त्याने कामावरून काढले आहे. त्यामुळे त्याला दुसºया एजन्सीसोबत आता व्यवहार करावे लागत आहेत. डेपने गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात युनायटेड टॅलेंट एजन्सीच्या (यूटीए) ट्रेसी जॅकब यांना कामावरून काढले होते. ती गेल्या कित्येक वर्षांपासून जॉनी डेप याच्यासाठी काम करीत होती. 

पेजिसक्स डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, डेपने ट्रेसीला सांगितले होते की, तुला तुझे कमिशन देण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. त्यामुळे तुझ्यासोबत आता पुढच्या काळात मला कुठल्याच प्रकारचे काम करायचे नाही. ट्रेसीसोबतचे नाते तोडल्यानंतर जॉनी आता तो ‘क्रिएटिव्ह आर्टिस्ट एजन्सी’बरोबर (सीएए) जोडला गेला आहे. एजन्सीसोबत त्याने केलेली डील समाधानकारक असल्याचे त्याचे म्हणणे आहे. 

डेपच्या या निर्णयाबाबत सूत्रांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून जॉनी डेप आर्थिक अडचणींचा सामना करीत होता. त्यातच पत्नीसोबत घटस्फोट घ्यावा लागल्याने त्याला मानसिक अस्थिरतेचाही सामना करावा लागला. त्यामुळेच त्याने एजंन्सी बदलण्याचा निर्णय घेतला असावा. मात्र याविषयी काहीही सांगण्यास सीएए आणि यूटीए या दोन्ही एजंन्सीज्नी बोलण्यास नकार दिला आहे. गेल्या आठवड्यास डेपच्या बिझनेस प्रबंधकांनी दाखल केलेल्या दस्तावेजामुळे याबाबतचा खुलासा होऊ शकला. त्याने एक महिन्यात तब्बल २० लाख डॉलर खर्च केल्याचे या दस्तावेजावरून स्पष्ट होते. 

Web Title: Johnny Depp is facing financial difficulties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.