ठळक मुद्देत्याची पत्नीच त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करायची. तसेच कॅन्स, बॉटल्स, पेटलेल्या मेणबत्त्या, टिव्हीचा रिमोट त्याच्या अंगावर फेकून मारायची असे त्याने सांगितले आहे. यामुळे त्याला अनेकवेळा दुखापत देखील झाली आहे.

हॉलीवुड सुपरस्टार जॉनी डेपला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याचा आगामी चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. जॉनी सध्या त्याच्या व्यवसायिक नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. तो चर्चेत येण्यामागे एक खास कारण आहे. डेप आणि त्याच्या पत्नीचा वाद गेल्या कित्येक महिन्यांपासून कोर्टात सुरू असून या वादाला आता एक वेगळे वळण मिळाले आहे. 

जॉनी डेपची पत्नी अंबर हर्ड त्याला मारहाण करायची असे त्याने कोर्टात सांगितले आहे. ते दोघे २०१६ पासून वेगळे राहात आहेत. तेव्हापासूनच त्यांची कोर्टात केस सुरू असून जॉनी मला सतत मारायचा असे अंबरने कोर्टात सांगितले होते. पण आता जॉनीने कोर्टात काही पुरावे सादर केले असून त्यालाच अंबर मारायची असे त्याने कोर्टात सांगितले आहे. ते दोघे वेगळे व्हायच्या आधी हा प्रकार सुरू होता असे त्याने म्हटले आहे. एवढेच नव्हे तर त्याची पत्नी अंथरुणातच प्रातविधी करायची. या सगळ्यामुळेच त्याने तिच्यासोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्याने म्हटले आहे.

USA Today ने दिलेल्या वृतानुसार जॉनी डेपवर त्याच्या पत्नीने केलेले मारहाणीचे सगळे आरोप खोटे असल्याचे त्याने कोर्टात म्हटले आहे. त्याची पत्नी अंबरने कोर्टात सादर केलेले फोटो हे खरे नसून ते फोटो अॅप्लिकेशनद्वारा बनवण्यात आले आहेत. उलट त्याची पत्नीच त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करायची. तसेच कॅन्स, बॉटल्स, पेटलेल्या मेणबत्त्या, टिव्हीचा रिमोट त्याच्या अंगावर फेकून मारायची असे त्याने सांगितले आहे. यामुळे त्याला अनेकवेळा दुखापत देखील झाली आहे. त्याला दुखापत झाली होती, त्यावेळेचे काही फोटो त्याने कोर्टात सादर केले असून एका फोटोत त्याचा डोळा सुजलेला दिसत आहे तर दुसऱ्या फोटोत त्याच्या अंगावर ओरबडल्याच्या खुणा दिसत आहेत.

जॉनी डेपने ब्लॅक मास, पब्लिक एनेमिज, डेड मॅन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या पायरेट्स ऑफ कॅरेबियन या चित्रपटांच्या सगळ्याच सिरिजना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे.  


Web Title: Johnny Depp accuses Amber Heard of domestic abuse
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.