कोरोनामुळे या प्रसिद्ध कॉमेडियनचे झाले निधन, फॅन्सवर पसरली शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 10:52 AM2020-03-31T10:52:38+5:302020-03-31T10:55:42+5:30

या अभिनेत्याचे फॅन्स सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

Japanese comedian Ken Shimura dies from coronavirus PSC | कोरोनामुळे या प्रसिद्ध कॉमेडियनचे झाले निधन, फॅन्सवर पसरली शोककळा

कोरोनामुळे या प्रसिद्ध कॉमेडियनचे झाले निधन, फॅन्सवर पसरली शोककळा

googlenewsNext
ठळक मुद्देजपानचे प्रसिद्ध कॉमेडियन केन शिमुरा यांचे कोरोनामुळे निधन झाले असून ते ७० वर्षांचे होते. १९७० पासून त्यांनी त्यांच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे.

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. कोरोनामुळे जगभरातील अनेकांना आजवर आपले प्राण गमवावे लागले आहेत. एका प्रसिद्ध अभिनेत्याचे नुकतेच कोरोना व्हायरसने निधन झाले आहे.

जपानचे प्रसिद्ध कॉमेडियन केन शिमुरा यांचे कोरोनामुळे निधन झाले असून ते ७० वर्षांचे होते. १९७० पासून त्यांनी त्यांच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. २०१६ पासून ते कॅन्सरच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाला असून त्याच्यावर उपचार सुरू होते. शिमुरा यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने १९ मार्चला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांनी नुकताच अखेरचा श्वास घेतला.

केन यांनी जपानी मनोरंजन जगतावर राज्य केले होते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला असून ते सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.  

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आहे. त्यामुळे २१ दिवस देशातील सगळेच कामकाज ठप्प राहाणार आहे. 

Web Title: Japanese comedian Ken Shimura dies from coronavirus PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.