hollywood model elle fanning fainted because of her extreme tight dress | ड्रेस होता इतका घट्ट की मॉडेल पडली बेशुद्ध!
ड्रेस होता इतका घट्ट की मॉडेल पडली बेशुद्ध!

रॅम्पवर चालणा-या मॉडेल्स, अनेक इव्हेंटमध्ये मिरवणाºया हिरोईन पाहून अनेक तरूणी हुरळून जातात.   त्यांच्यासारखे दिसण्यासाठी जीवाचा आटापीटा करतात. पण रॅम्पवर मिरवणा-या या मॉडेल्स, नट्यांना काय काय दिव्यातून जावे लागते, हे त्यांनाच ठाऊक़. आता हेच बघा, एका मॉडेलचा ड्रेस इतका घट्ट होता की, त्यामुळे ती चक्क बेशुद्ध पडली.


होय, ही मॉडेल आहे ऐली फेनिंग. अलीकडे तिच्यासोबत असेच काही घडले. ही घटना आहे कान्स फिल्म फेस्टिवलमधील. गत २३ मे रोजी कान्स डिनरदरम्यान ऐलीने एक सुंदर ड्रेस घातला. पण हा ड्रेस इतका घट्ट होता की, काहीच वेळात तिचा जीव गुदमरायला लागला आणि ती बेशुद्ध पडली. ऐलीने स्वत: इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली आहे. ‘आज माझा 1950 ड्रेस घातल्यानंतर बेशुद्ध पडले. पण नंतर सगळे ठीक झाले,’असे तिने लिहिले. यासोबत  आणि असे हॅशटॅगही तिने वापरले. यावरून यादरम्यान ऐलीचे पीरियड सुरु होते, हे कळते.
 


Web Title: hollywood model elle fanning fainted because of her extreme tight dress
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.