हॉलिवूडमधील हे स्टार कपल झाले विभक्त, लग्नाच्या 8 महिन्यातच घटस्फोटासाठी केला होता अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 04:31 PM2020-01-30T16:31:51+5:302020-01-30T16:33:55+5:30

हॉलिवूडचे सर्वात क्यूट जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं.

Hollywood divorce finalized between miley and hemsworth | हॉलिवूडमधील हे स्टार कपल झाले विभक्त, लग्नाच्या 8 महिन्यातच घटस्फोटासाठी केला होता अर्ज

हॉलिवूडमधील हे स्टार कपल झाले विभक्त, लग्नाच्या 8 महिन्यातच घटस्फोटासाठी केला होता अर्ज

googlenewsNext

अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका माइली आणि अभिनेता लिएम हेम्सवर्थने यांचा घटस्फोट झाला आहे. इंडिया डॉटच्या रिपोर्टनुसार लॉस एंजेलिसमध्येमधील न्यायाधीशांनी दोघांच्या घटस्फोट झाला आहे. माइली व लिएम यांनी एकमेकांच्या सहमतीनं विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण दोघांनाही करियरमध्ये लक्ष केंद्रीत करायचं आहे. माइली व लिएम २०१८मध्ये लग्नबेडीत अडकले होते. लग्नाच्या आठ महिन्यानंतप दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. डिसेंबरमध्ये लग्न झाले आणि ऑगस्टमध्ये दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. 


लग्नाच्या आधी ते दोघे एकमेकांना दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून एकमेकांना ओळखत होते. हॉलिवूडचे सर्वात क्यूट जोडी म्हणून माइली सायरस व अभिनेता लिएम हेम्सवर्थ यांच्याकडे पाहिलं जायचं. सायरसच्या निकटवर्ती सूत्रानं पीपल डॉट कॉमला सांगितलं की, लिएम व माइली या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दोघांना स्वतःवर व करियरवर जास्त लक्ष द्यायचं आहे. कृपया त्यांच्या निर्णयाचा आदर कराल. माईली सायरस सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ते इंस्टाग्रामवर तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.
 

Web Title: Hollywood divorce finalized between miley and hemsworth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.