hilary duff welcomes baby girl with bf matthew koma | हिलेरी डफ दुस-यांना बनली आई, दिला गोंडस मुलीला जन्म!
हिलेरी डफ दुस-यांना बनली आई, दिला गोंडस मुलीला जन्म!

एका मुलाची आई असलेली अमेरिकन अभिनेत्री, गायिका, लेखिका हिलेरी डफ दुस-यांदा आई बनली आहे. होय, अलीकडे हिलेरीने एका कन्यारत्नाला जन्म दिला. ही कुलगी हिलेरी व तिचा बॉयफ्रेन्ड मॅथ्यू कोमा याचे अपत्य आहे.  

View this post on Instagram


मुलगी झाल्याची बातमी खुद्द हिलेरीने सोशल अकाऊंटवर शेअर केली. ‘घरात चिमुकला पाहुणा आल्याचा आनंद आहे. ही आमची लकी चार्म आहे,’ असे मुलीचा फोटो शेअर करत हिलेरीने लिहिले आहे. हिलेरीने आपल्या मुलीचे बैंक वायलेट बेअर असे नामकरण केले आहे. अलीकडे बॉयफ्रेन्ड मॅथ्यूसोबत लग्न कधी करणार, असा प्रश्न हिलेरीला विचारण्यात आला होता. यावर लग्न करून या नात्याला टॅग देण्याची गरज मला अद्याप तरी जाणवली नाही. आम्ही एकमेकांसोबत आनंदी आहोत, असे हिलेरी म्हणाली होती. ३० वर्षांच्या हिलेरीने गतवर्षी डिसेंबरमध्ये पुन्हा मॅथ्यूसोबत रिलेशनमध्ये असल्याची घोषणा केली होती. त्याआधी मार्चमध्ये मॅथ्यूपासून ती वेगळी झाली होती. गत जूनमध्ये हिलेरीने प्रेग्नंट असल्याचे उघड केले होते.
२००० मध्ये शिकागो होप या मेडिकल ड्रामापासून करिअरला सुरूवात केली. २००१ मध्ये आलेल्या  लिजी मॅकग्वायर या टीव्ही सीरिजमधून तिला लोकप्रीयता मिळाली. या सीरिजवर २००३ मध्ये यावर चित्रपटही आला होता. अभिनेत्रीशिवाय हेलरी एक गायिकाही आहे.

Web Title: hilary duff welcomes baby girl with bf matthew koma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.