हॉलिवूडचा अभिनेता ड्वेन जॉन्सन उर्फ द रॉकच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. ड्वेनने त्याची मॉडेल व गर्लफ्रेंड लॉरेन हैशनसोबत विवाह केला आहे. ही माहिती खुद्द त्यानेच इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून दिली आहे. 


ड्वेनने १८ ऑगस्ट रोजी लॉरेनसोबत हवाईमध्ये लग्न केलं. या आनंदाच्या प्रसंगी फक्त ड्वेन व लॉरेन यांचे नातेवाईकांसोबत जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. सूत्रांच्या माहितीनुसार, ड्वेन आणि लॉरेन २००७ पासून एकमेकांना ओळखतात. द रॉकला एक्स बायको डॅनी ग्रासियापासून एक मुलगी आहे. तसेच लॉरेनपासून ड्वेनला एक मुलगा आहे. 


ड्वेन आणि डॅनीनं १९९७ साली लग्न केले होते. ते दोघं कॉलेजचे मित्र होते. ड्वेनच्या फिल्मी करियरबद्दल सांगायचं तर द स्कॉर्पियन किंग, फास्ट अँड फ्युरियस सीरिज यासोबत बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे.


नुकतंच ड्वेनचा हॉब्स अँड शॉ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटात ड्वेनसोबत जेसन स्टेथम व इदरिस एल्बा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 


वरूण धवनने हा चित्रपट पाहून ट्विटरवर ड्वेन जॉन्सनचे खूप कौतूक केले. वरूणच्या प्रशंसेला ड्वेननंदेखील प्रतिक्रिया दिली आहे. 

Web Title: Good News! Dwayne The Rock Johnson Has Married His Girlfriend Lauren Hashian In Hawaii

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.