प्रतीक्षा संपली! ‘Game of Thrones 8’चा टीजर रिलीज!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 10:58 AM2019-01-14T10:58:59+5:302019-01-14T10:59:43+5:30

हॉलिवूडचा सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही शो ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या आठच्या सीझनची घोषणा झाली आणि प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली. आता या शोचा टीजर रिलीज करण्यात आलाय. शिवाय शोची रिलीज डेटही जाहिर करण्यात आलीय.

Game of Thrones season 8 teaser, premiere date released | प्रतीक्षा संपली! ‘Game of Thrones 8’चा टीजर रिलीज!!

प्रतीक्षा संपली! ‘Game of Thrones 8’चा टीजर रिलीज!!

googlenewsNext
ठळक मुद्देआर्यन थ्रोनवर कोण बसणार? Azor Ahai कोण आहे? CleganeBowl कोण जिंकणार आणि  Cersei ला कोण मारणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. या सीझनमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार, अशी अपेक्षा आहे.

हॉलिवूडचा सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही शो ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या आठच्या सीझनची घोषणा झाली आणि प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली. आता या शोचा टीजर रिलीज करण्यात आलाय. शिवाय शोची रिलीज डेटही जाहिर करण्यात आलीय. त्यानुसार, येत्या 14  एप्रिलला शो रिलीज होतोय.
जगभरात सर्वाधिक पाहिला जाणारा टीव्ही शो ‘गेम ऑफ थ्रोन्स 8’चा टीजर येताच चाहते क्रेजी झालेले दिसताहेय. काही तासांत लाखो लोकांनी हा टीजर पाहिलाय. 90 सेकंदाच्या या टीजरमध्ये तीन महत्त्वपूर्ण पात्रांना दाखवण्यात आले आहे. जे आपल्या पुर्वजांच्या घरात हातात तलवार घेऊन फिरत आहेत. ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे फायनल सीझनचा शेवट कसा असेल, याचा अंदाज या टीजरवरून येतोय.  




 ‘गेम ऑफ थ्रोन्स 8’मध्ये केवळ 6 एपिसोड असतील, असे म्हटले जात आहे. मात्र या प्रत्येक एपिसोडची लांबी चित्रपटाइतकी असेल, असेही कळतेय. ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे जगभर चाहते आहेत. भारताही या शोचे चाहते आहे.

2017 मध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे 7 वे सीझन रिलीज झाले होते. मात्र 2018 मध्ये याचे नवे सीझन रिलीज केले गेले नाही. त्यासाठी चाहत्यांना 2019ची प्रतीक्षा करावी लागली. 


‘गेम ऑफ थ्रोन्स’ हा शो अंतिम टप्प्यावर आहे. मात्र असे अनेक पैलू आहेत जे 6 एपिसोडमध्ये दाखवणे मेकर्ससाठी सोपे नव्हते. आर्यन थ्रोनवर कोण बसणार? Azor Ahai कोण आहे? CleganeBowl कोण जिंकणार आणि  Cersei ला कोण मारणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. या सीझनमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Game of Thrones season 8 teaser, premiere date released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.