Fast and Furious च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, तुमची आवडती सीरीज होणार बंद

By अमित इंगोले | Published: October 22, 2020 01:29 PM2020-10-22T13:29:23+5:302020-10-22T13:34:23+5:30

Fast and Furious या सिनेमा सीरीजच्या फॅन्ससाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. यूनिव्हर्सल पिक्चर्सने बुधवारी ही सीरीज बंद करण्याचा निर्णय घेतलाय.

Fast and Furious Series Will End after 11th Films says Reports | Fast and Furious च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, तुमची आवडती सीरीज होणार बंद

Fast and Furious च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, तुमची आवडती सीरीज होणार बंद

googlenewsNext

सुसाट धावणाऱ्या एकापेक्षा एक स्पोर्ट्स कार्स, सोबतच धमाकेदार अ‍ॅक्शन सीन्स असलेल्या हॉलिवू़डच्या 'फास्ट अ‍ॅन्ड फ्युरिअस' (Fast and Furious) सिनेमाच्या सीरीजचं लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना वेड लागलं आहे. जगभरात या सीरीजचे कित्येक फॅन्स आहेत. पण आता या सीरीजच्या फॅन्ससाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. यूनिव्हर्सल पिक्चर्सने बुधवारी ही सीरीज बंद करण्याचा निर्णय घेतलाय.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Fast and Furious सिनेमांची सीरीज ११व्या सिनेमानंतर बंद केली जाईल. असेही सांगितले जात आहे की, जस्टिन लिन या सिनेमाच्या शेवटच्या दोन भागांचं दिग्दर्शन करणार आहे. 

Fast and Furious 9 ज्याला F9 असंही नाव आहे हा सिनेमा कोरोनामुळे सध्या रिलीज होणार नाही. हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये रिलीज होईल. जस्टिन लिनने आतापर्यंत या सीरीजच्या चार सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. इतर देशांप्रमाणे भारतातही या सीरीजचे कोट्यवधी फॅन्स आहेत.

दिग्दर्शक जस्टिन लिनने याआधी या सीरीजच्या फास्ट अ‍ॅन्ड फ्यूरिअस: 'टोकियो ड्रिफ्ट', 'फास्ट अ‍ॅन्ड फ्यूरिअस फाइव्ह (F5)' आणि 'फास्ट अ‍ॅन्ड फ्यूरिअस 6' चं सुद्धा दिग्दर्शन केलं आहे. दरम्यान Fast and Furious च्या शेवटच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला होता. या सिनेमात विन डीजलसोबत मिशेल रॉड्रिग्ज, जोरदाना ब्रूस्टर आणि टायरिस गिब्सन आणि लुडाक्रिस दिसले होते. आता पुढील सिनेमात जॉन सिनाही दिसणार आहे.

Web Title: Fast and Furious Series Will End after 11th Films says Reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.