ठळक मुद्देइकातिराना ही इन्स्टाग्राम स्टार होती. तिच्या हत्येच्या बातमीने रशियात खळबळ उडाली आहे.

रशियाची इकातिराना काराग्लानोवा ही इन्स्टाग्राम स्टार कुठल्या हॉलिवूड स्टारपेक्षा कमी नव्हती. अलीकडे तिचा गळा कापून निर्घृण खून करण्यात आला. एका सुटकेसमध्ये तिचा मृतदेह सापडला.
24 वर्षांची इकातिरानाशी गेल्या अनेक दिवसांपासून संपर्क होत नव्हता. त्यामुळे तिचे आई-वडिल तिच्या मास्को येथील अपार्टमेंटमध्ये पोहोचले. पण इथे पोहोचल्यावर त्यांना धक्काच बसला. सुटकेसमध्ये त्यांना मुलीचा मृतदेह दिसला. इकातिराना ही इन्स्टाग्राम स्टार होती. तिच्या हत्येच्या बातमीने रशियात खळबळ उडाली आहे.

इकातिराना आपले ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करायची. तिच्या चाहत्यांच्या या फोटोवर उड्या पडायच्या. हॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा तिची लोकप्रियता कमी नव्हती.

सोशल मीडियावर तिचे 90000 फॉलोवर्स होते. चाहते तिची तुलना ऑड्रे हेपबर्नशी करायचे. तिचा एक लोकप्रिय ट्रॅव्हल ब्लॉक होता. ज्यास हजारो लोक फॉलो करायचे. 22 जुलैला तिने अखेरची पोस्ट केली होती.


नुकतीच इकातिरानाने मेडिकल कॉलेजमधून पदवी घेतली होती. डर्माटॉलॉजीमध्ये तिने स्पेशलाईजेशन केले होते.


अद्याप पोलिसांनी तिच्या हत्येप्रकरणी कुणालाही अटक केलेली नाही. घटनास्थळावरून कुठलेही धारदार शस्त्र सापडले नाही.

पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये इकातिरानाचा एक्स-बॉयफ्रेन्ड दिसतो आहे. याच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर इकातिराना नव्याने प्रेमात पडली होती.

English summary :
Russia's Ekaterina Karaglanova was an Instagram star. Recently, she was brutally murdered due to cutting her throat. Her body was found in a suitcase.


Web Title: ekaterina karaglanova russian instagram influencer found dead throat slit stuffed suitcase
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.