Corona Virus Pandemic:एकीकडे कोरोनाची दहशत तरीही या प्रसिद्ध मॉडेलला सुचतोय रोमान्स, अशा प्रकारे कपलने केले एकमेकांना KISS

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 02:37 PM2020-03-16T14:37:59+5:302020-03-16T14:39:36+5:30

हेडी गेल्या काही दिवसांपासून आजारीही आहे. त्यामुळेच हेडी क्लमने खबरदारी म्हणून आपल्या पतीला किस करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे.

Corona Virus Pandemic: See How America Supermodel Heidi klum kissing husband video Viral-SRJ | Corona Virus Pandemic:एकीकडे कोरोनाची दहशत तरीही या प्रसिद्ध मॉडेलला सुचतोय रोमान्स, अशा प्रकारे कपलने केले एकमेकांना KISS

Corona Virus Pandemic:एकीकडे कोरोनाची दहशत तरीही या प्रसिद्ध मॉडेलला सुचतोय रोमान्स, अशा प्रकारे कपलने केले एकमेकांना KISS

googlenewsNext

सुमारे 100 देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. चित्रपट आणि एकंदरित मनोरंजन व्यवसायाला देखील याचा जोरदार फटका बसला आहे. अनेक चित्रपटांचे, मालिकांचे शूटिंग रद्द करण्यात आले असून बहुतांश चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तातडीच्या कामाशिवाय घरातून बाहेर न पडण्याचे निर्देश देण्यात आल्यामुळे अनेक कलाकारांनाही घरात बसून राहण्याची वेळ आलीय. कोरोनामुळे सगळ्यांनाचा याची धडकी भरली आहे. अशातच एका मॉडेलचा किसींग व्हिडीओ समोर आला आहे. 


तसेच हेडी गेल्या काही दिवसांपासून आजारीही आहे. त्यामुळेच हेडी क्लमने खबरदारी म्हणून आपल्या पतीला किस करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. काचेतुनच ती आपल्या पतीला किसी करताना पाहायला मिळते.एकीकडे सगळ्या जगाला कोरोनामुळे धडकी भरली असताना हेडीने अशातही रोमान्स कसा करावा याचीच आयडीयाची कल्पना सांगितली आहे. 


कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी या साथीला महारोगराई घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Corona Virus Pandemic: See How America Supermodel Heidi klum kissing husband video Viral-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.