कॅनेडियन व हॉलिवूडचा लोकप्रिय चित्रपट टायटॅनिकची सिंगर सेलीन डियोन काही दिवसांपूर्वी पॅरिस फॅशन वीकमध्ये दिसली. यावेळी तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती खूपच स्किनी वाटत होती. तिने नक्कीच चांगल्या ड्रेसची निवड केली असेल मात्र तिचा हा ड्रेस तिच्या चाहत्यांना अजिबात भावला नाही. ५१ वर्षीय गायिकेला जेव्हा चाहत्यांनी पाहिलं तेव्हा त्यांची झोपच उडाली आणि त्यांना तिची काळजी वाटते आहे. 

सेलीन डियोनला पाहून तिच्या चाहत्यांनी ती खूप बारीक झाल्याचं सांगत चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर एका युजरने तिला विचारलं की, सेलीन असं कसं झालं.. तू खुप स्किनी वाटत आहेस. सर्व काही ठीक आहे ना. तर दुसऱ्या युजरने लिहिलं की, तु तुझ्या शरीरासोबत काय केलं आहेस. बारीक होणं तुला शोभत नाही. तर एका युजरने तू भयानक वाटते आहे असे म्हटलं आहे. तर एकानं तू खराब ड्रेस घातलाय अशी कमेंट केल आहे. 


सेलीनने लांब पारदर्शक ड्रेस परिधान केला होता. त्यावर तिने कोणतीही ज्वेलरी परिधान केली नव्हती. डोळ्यांच्या मेकअपने तिच्या ड्रेसचा लूक पूर्ण केला होता. त्यावेळी तिने केसही मोकळे सोडले होते.


सेलीनने नुकतेच तिच्या दिवंगत पती रेने एंजेलिलवर बोलताना दिसली होती. ती म्हणाली की, तिचा नवरा नेहमी तिच्यासोबत राहायचे. वेबसाईट फीमेल फर्स्ट डॉट युकेच्या नुसार, सेलीन दररोज आपल्या नवऱ्याला मिस करते.

एंजेलिलचं तीन वर्षांपूर्वी निधन झालं.


Web Title: Celine Dion leaves fans in shock with new pics from Paris Fashion Week
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.