Avengers Endgame Trailer In Hindi , avengers 4 endgame official trailer | Avengers Endgame Trailer In Hindi: पृथ्वीवर पुन्हा परतला आयर्न मॅन! पाहा,‘अ‍ॅवेंजर्स- एंडगेम’चा दमदार ट्रेलर!!
Avengers Endgame Trailer In Hindi: पृथ्वीवर पुन्हा परतला आयर्न मॅन! पाहा,‘अ‍ॅवेंजर्स- एंडगेम’चा दमदार ट्रेलर!!

ठळक मुद्देअ‍ॅवेंजर्स- एंडगेम’चे दिग्दर्शक जो रूसो लवकरच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात येणार आहेत. येत्या २६ एप्रिलला हा चित्रपट रिलीज होतोय.

कॅप्टन मार्वेलच्या एवेंजर्स सीरिजच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपलीय. या सीरिजचा सर्वात मोठा हॉलिवूडपट ‘अ‍ॅवेंजर्स- एंडगेम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तूर्तास या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय आणि या ट्रेलरने लोकांना अक्षरश: वेड लावले आहे.
मार्वेलच्या सुपरहिरोची कहाणी सुरु होते, तिथून ‘अ‍ॅवेंजर्स- एंडगेम’ च्या ट्रेलरची सुरुवात होते. एका गुफेत बनलेला आयर्नमॅन, एका इंजेक्शनमुळे डीएनएमध्ये आलेल्या बदलामुळे बनलेला कॅप्टन अमेरिका आणि दुसऱ्या ग्रहावरून आलेला थोर, हॉक आय, ब्लॅक विडो सगळे एकापाठोपाठ एक समोर येतात. हे सारे सुपरहिरो आजही जगात आहे. आपल्या मित्रांच्या मृत्यूनंतर सगळे एकजूट होतात आणि या सगळ्यांना साथ द्यायला येते ती कॅप्टन मार्वेल. रूसो ब्रदर्सने २ मिनिट २८ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये अगदी अख्ख्या चित्रपटाचे सार दाखवले आहे.

‘अ‍ॅवेंजर्स - एंडगेम’मध्ये थानोसपासून जगाला वाचवण्याचा एक शेवटचा प्रयत्न होणार आहे. हा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या ट्रेलरची सर्वात खास बात म्हणजे, यात सर्व अ‍ॅवेंजर्स क्वांटम सूटमध्ये दिसत आहेत. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या कथेनुसार, अ‍ॅवेंजर्स क्वांटम रील्मच्यामाध्यमातून भूतकाळात जातील आणि सगळे काही ठीक करतील. अशात अ‍ॅवेंजर्सने क्वांटम सूट घालणे, व्हायरल झालेल्या कथेला बळ देणारे आहे.
अ‍ॅवेंजर्स- एंडगेम’चे दिग्दर्शक जो रूसो लवकरच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात येणार आहेत. येत्या २६ एप्रिलला हा चित्रपट रिलीज होतोय.

English summary :
Captain Marvel's Avengers series fans wait for The biggest Hollywood movie 'Avengers-Endgame 4'. The movie trailer of is released. As soon as the trailer is released, it has become viral on the social media.


Web Title: Avengers Endgame Trailer In Hindi , avengers 4 endgame official trailer
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.