‘अ‍ॅव्हेजर्स- एंडगेम’वर प्रेक्षकांच्या उड्या! दर सेकंदाला १८ तिकिटांची विक्री!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 03:39 PM2019-04-23T15:39:25+5:302019-04-23T15:39:49+5:30

मार्वेलचा सुपरहिरो फ्रेंचाइजी ‘अ‍ॅव्हेजर्स- एंडगेम’ हा हॉलिवूडपट येत्या शुक्रवारी रिलीज होतोय. पण त्याआधी या चित्रपटाबद्दल जगभर जबरदस्त क्रेज पाहायला मिळतेय. भारतातील स्थितीही यापेक्षा वेगळी नाही.

avengers endgame advance booking india breaks records sells 18 tickets per second | ‘अ‍ॅव्हेजर्स- एंडगेम’वर प्रेक्षकांच्या उड्या! दर सेकंदाला १८ तिकिटांची विक्री!!

‘अ‍ॅव्हेजर्स- एंडगेम’वर प्रेक्षकांच्या उड्या! दर सेकंदाला १८ तिकिटांची विक्री!!

googlenewsNext
ठळक मुद्देभारतात इंग्लिश व हिंदीशिवाय तेलगू व तामिळ भाषेत हा चित्रपट रिलीज होतोय.

मार्वेलचा सुपरहिरो फ्रेंचाइजी ‘अ‍ॅव्हेजर्स- एंडगेम’ हा हॉलिवूडपट येत्या शुक्रवारी रिलीज होतोय. पण त्याआधी या चित्रपटाबद्दल जगभर जबरदस्त क्रेज पाहायला मिळतेय. भारतातील स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. हा चित्रपट कधी एकदा रिलीज होतो, असे भारतीय चाहत्यांना झालेय. हेच कारण आहे की, भारतात केवळ एका दिवसांत या चित्रपटाच्या १० लाखांवर तिकिटांची विक्री झालीय. याचसोबत ‘अ‍ॅव्हेजर्स- एंडगेम’ने अ‍ॅडव्हान्स बुकिंगचे सगळे विक्रम तोडले आहेत.




बुकमाइशो अ‍ॅपने म्हटल्यानुसार, दर सेकंदाला ‘अ‍ॅव्हेजर्स- एंडगेम’च्या १८ तिकिटांचे बुकिंग झाले आहे. यावरून ‘अ‍ॅव्हेजर्स- एंडगेम’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला मिळणाºया अभूतपूर्व प्रतिसादाची कल्पना यावी. अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत, ‘अ‍ॅव्हेजर्स- एंडगेम’ ने बाहुबली2, ठग्स आॅफ हिंदोस्तान, टायगर जिंदा है यासारख्या चित्रपटांना कधीच मागे टाकले आहे. एका ढोबळ आकडेवारीनुसार, भारतात आत्तापर्यंत ‘अ‍ॅव्हेजर्स- एंडगेम’चे ३५ कोटींचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. याआधी बाहुबली 2 या चित्रपटाचे ३१.५० कोटींचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाले होते. ठग्स आॅफ हिंदोस्तानचे २७.५० कोटी तर टायगर जिंदा हैचे २५ कोटींचे बुकिंग झाले होते. ही आकडेवारी बघितल्यानंतर ‘अ‍ॅव्हेजर्स- एंडगेम’  हा चित्रपट ओपनिंग डे रेकॉर्ड ध्वस्त करणार, हे निश्चित आहे. लोकांमधील क्रेज बघता, १०० पेक्षा अधिक शहरांत दररोज चित्रपटाचे १००० पेक्षा अधिक शो होणार आहेत. विशेषत: दिल्ली व मुंबईत या चित्रपटाने लोकांना अक्षरश: वेड लावले आहे.


भारतात इंग्लिश व हिंदीशिवाय तेलगू व तामिळ भाषेत हा चित्रपट रिलीज होतोय. ‘अ‍ॅव्हेजर्स- एंडगेम’  हा मार्वेल स्टुडिओजचा २२ वा चित्रपट आहे. ‘अ‍ॅव्हेंजर्स- द एंडगेम’हा मार्वेलचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठ्या लांबीचा चित्रपट असणार आहे. हा चित्रपट ३ तास २ मिनिटांचा असेल. या चित्रपटात मार्वेल सीरिजच्या २२ चित्रपटांचे सुपरहिरो एकत्र दिसणार आहेत.  चीन व आॅस्ट्रेलियामध्ये येत्या २४ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. तर अमेरिेकेत २५ एप्रिल आणि भारतात २६ एप्रिलला बॉक्सआॅफिसवर झळकणार आहे.
 

Web Title: avengers endgame advance booking india breaks records sells 18 tickets per second

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.