अभिनेत्री रोन्नी हॉकला नुकतीच लॉस एंजेलिस पोलिसांनी घरगुती हिंसाचारा प्रकरणी अटक केली होती.  रॉनी हॉकने आपल्या बॉयफ्रेंडसह राहत असून त्याला  घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. रॉनी बॉयफ्रेंडला खूप त्रास देते. त्याचे जगणेच असह्य करून ठेवले आहे. रॉनी विरोधात शेजारच्यांनीह तक्रार दिली होती. शेजा-यांनाही ती शिवीगाळ करत असते. अंगावर काही जखमा होत्या व पायाला देखील दुखापत झाली होती. याबाबत आणखी चौकशी केली असता रॉनी आपल्या बॉयफ्रेंडला देखील त्रास देत असल्याची माहिती समोर आली. 


रॉनीने आज प्रत्येकाचे जीणं असह्य केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या.  धक्कादायक बाब म्हणजे  लॉस एंजेलिस पोलिसांनी रॉनीविरोधात गुन्हा दाखल केला व तिला अटक केली. परंतु अटक होताच पुढच्या तीन तासांमध्ये १० हजार अमेरिकी डॉलर्सवर तिला जामीन मिळाला आहे.


रोन्नी हॉक यांनी वयाच्या १२ व्या वर्षी अभिनय व मॉडेलिंगला सुरुवात केली. तिने  जाहिरातींसाठी मॉडेलिंग केली आहे. यानंतर तिने अभिनेत्री होण्याचे स्वप्न बाळगण्याचे ठरविले आणि लॉस एंजेलिसमध्ये राहायला गेले आणि बर्‍याच टीव्ही जाहिरातींचा भाग बनले. काही बड्या बॅनरचे प्रोजेक्टसहीमध्येही तिने काम केले आहे.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress Ronni Hawk Arrested Charged For Domestic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.