Tokyo Olympics: हरमनप्रीतचे आक्रमण, श्रीजेशचा बचाव; रोमहर्षक लढतीत न्यूझीलंडवर मात करत भारताची टोकियोमध्ये विजयी सलामी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 08:50 AM2021-07-24T08:50:06+5:302021-07-24T09:22:43+5:30

Tokyo Olympics Live Updates: भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिमधील आपल्या अभियानाची विजयी सुरुवात केली आहे. आज शेवटच्या सेकंदापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीय हॉकी संघाने न्यूझीलंडवर ३-२ ने मात केली.

Tokyo Olympics: Indian Men's hockey team won against New Zealand in the opening match | Tokyo Olympics: हरमनप्रीतचे आक्रमण, श्रीजेशचा बचाव; रोमहर्षक लढतीत न्यूझीलंडवर मात करत भारताची टोकियोमध्ये विजयी सलामी

Tokyo Olympics: हरमनप्रीतचे आक्रमण, श्रीजेशचा बचाव; रोमहर्षक लढतीत न्यूझीलंडवर मात करत भारताची टोकियोमध्ये विजयी सलामी

Next

टोकियो - भारतीय पुरुष हॉकी संघाने (Indian men's Hockey team)टोकियो ऑलिम्पिमधील आपल्या अभियानाची विजयी सुरुवात केली आहे. आज शेवटच्या सेकंदापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीयहॉकी संघाने न्यूझीलंडवर ३-२ ने मात केली. भारताकडून हरमनप्रीत सिंगने (Harmanpreet Singh) दोन तर रूपिंदरपाल सिंग याने एक गोल केला. तर सामन्याच्या अखेरच्या क्षणांमध्ये गोलरक्षक श्रीजेश आणि बचाव फळीने केलेला अभेद्य बचाव भारताच्या विजयामध्ये निर्णायक ठरला. (Indian Men's hockey team won against New Zealand in the opening match, Harmanpreet, Sreejesh star as India beat New Zealand 3-2)

या लडतीला सुरुवात झाल्यावर पहिल्या क्वार्टरमध्ये सहाव्या मिनिटाला गोल करून न्यूझीलंडने सामन्यात आघाडी घेतली. मात्र दहाव्या मिनिटाला रूपिंदरपाल सिंगने गोल करून भारताला बरोबरी साधून दिली. पहिल्या क्वार्टरच्या अखेरीच दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत होते. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये २६ व्या मिनिटाला हरमनप्रित सिंगने गोल करून भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. मध्यांतरापर्यंत भारताने ही आघाडी कायम राखली. 

त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये ३३ व्या मिनिटाला अजून एक गोल करत हरमनप्रीत सिंगने ही आघाडी ३-१ अशी वाढवली. त्यानंतर ४३ व्या मिनिटाला न्यूझीलंडने दुसरा गोल करून भारताची आघाडी कमी केली. त्यानंतर चौथ्या आणि अखेरच्या क्वार्टरमध्ये न्यूझीलंडने जोरदार आक्रमण करून भारताची बचावफळी भेदण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, त्यांना काही पेनल्टी कॉर्नरही मिळाले. मात्र भारताचा गोलरक्षक श्रीजेश याने चपळ गोलरक्षण करत भारताचा बचाव अभेद्य राखला. अखेरीस भारताने ही लढत ३-२ अशा फरकाने जिंकून ऑलिम्पिकमधील आपल्या अभियानाची विजयी सुरुवात केली. 

Read in English

Web Title: Tokyo Olympics: Indian Men's hockey team won against New Zealand in the opening match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.