२४ वर्षांचा विश्वचषक विजयाचा दुष्काळ संपविण्यासाठी पाकिस्तान येणार भारतात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 03:26 PM2018-11-18T15:26:54+5:302018-11-18T15:27:09+5:30

भारत आणि पाकिस्तान या सख्या शेजाऱ्यांमधील संबंध संपूर्ण जगाला माहीत आहेत.

Pakistan hockey team ready to win world cup again after 24 years | २४ वर्षांचा विश्वचषक विजयाचा दुष्काळ संपविण्यासाठी पाकिस्तान येणार भारतात

२४ वर्षांचा विश्वचषक विजयाचा दुष्काळ संपविण्यासाठी पाकिस्तान येणार भारतात

googlenewsNext

मुंबई : भारत आणि पाकिस्तान या सख्या शेजाऱ्यांमधील संबंध संपूर्ण जगाला माहीत आहेत. पाकिस्तानातून होणाऱ्या दहशतवादी कुरापतीमुळे भारताने त्यांच्याशी क्रीडा क्षेत्रातील संबंध तोडले आहेत. त्यामुळे उभय देशांत द्विदेशीय मालिका होतच नाही आणि त्यांच्या खेळाडूंना भारतात होणाऱ्या स्पर्धेसाठीचा व्हिसाही अनेकदा नाकारण्यात आला आहे. मात्र, आगामी पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धी त्याला अपवाद ठरली आहे. ओडिशा येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाला व्हिसा देण्यात आला आहे. 



जगातील बलाढ्य संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत पाकिस्तान संघाच्या समावेशाबद्दल साशंकता होती. प्रायोजक न मिळाल्यामुळे पाकिस्तान संघ स्पर्धेतून माघार घेतो की काय असे चिन्ह दिसत होती. मात्र पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आर्थिक मदत केल्यामुळे हॉकी संघाचा सहभाग जवळपास निश्चित झाला होता. प्रशासकीय होता तो व्हिसाचा. 
शनिवारी भारतीय सरकारने तोही मान्य केल्याने पाकिस्तानी खेळाडूचे भारतात येणे पक्के झाले आहे. पाकिस्तान संघाने १३ प्रयत्नांत ४ वेळा विश्वचषक उंचावला आहे. त्यांनी १९९४ मध्ये शेवटची ही स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे २४ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी ते उत्सुक आहेत.


 

Web Title: Pakistan hockey team ready to win world cup again after 24 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.