‘वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलिट ऑफ द ईयर’साठी राणीला नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 03:17 AM2020-01-11T03:17:13+5:302020-01-11T03:17:17+5:30

फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकीने (एफआयएच) भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राहणी रामपाल हिला ‘वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलिट ऑफ द ईयर’ पुरस्कारासाठी नामनिर्देशित केले आहे.

Nominated rani for 'World Games Athlete of the Year' | ‘वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलिट ऑफ द ईयर’साठी राणीला नामांकन

‘वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलिट ऑफ द ईयर’साठी राणीला नामांकन

googlenewsNext

नवी दिल्ली : जागतिक हॉकीचे संचालन करणाऱ्या फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकीने (एफआयएच) भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राहणी रामपाल हिला ‘वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलिट ऑफ द ईयर’ पुरस्कारासाठी नामनिर्देशित केले आहे.
हॉकी इंडियाने दिलेलया माहितीनुसार या पुरस्कारासाठी एफआयएचने २५ खेळाडूंना नामांकन दिले. राणीचा शानदार खेळ आणि तिच्यातील नेतृत्वक्षमतेमुळे या पुरस्काराच्या चढाओढीत तिचा समावेश करण्यात आला आहे. हॉकी इंडिङयाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद म्हणाले,‘राणी देशातील अनेक खेळाडूंचे प्रेरणास्थान आहे. तिला या पुरस्काराच्या यादीत स्थान दिल्याचा हॉकी इंडिया आनंद आहे.’ विजेत्या खेळाडूचा निर्णय ३० जानेवारीपर्यंत आॅनलाईन मतदानाने होईल. राणीने भारतीय संघाला प्रथमच आॅलिम्पिकची पात्रता गाठण्यासाठी मेहनत घेतली हे विशेष. 

Web Title: Nominated rani for 'World Games Athlete of the Year'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.