भारताने बेल्जियमला २-२ ने बरोबरीत रोखले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 03:41 AM2018-12-03T03:41:11+5:302018-12-03T03:41:18+5:30

यजमान भारताने रविवारी पुरुष हॉकी विश्वचषकात पूल सीच्या लढतीत शानदार खेळ करताना आॅलिम्पिक रौप्यपदकविजेत्या बेल्जियमला २-२ असे बरोबरीत रोखले.

India stalled Belgium 2-2 | भारताने बेल्जियमला २-२ ने बरोबरीत रोखले

भारताने बेल्जियमला २-२ ने बरोबरीत रोखले

googlenewsNext

भुवनेश्वर : यजमान भारताने रविवारी पुरुष हॉकी विश्वचषकात पूल सीच्या लढतीत शानदार खेळ करताना आॅलिम्पिक रौप्यपदकविजेत्या बेल्जियमला २-२ असे बरोबरीत रोखले.
बेल्जियमच्या एलेनांडर हेंड्रिक्स याने आठव्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली होती. भारताने तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये हरमनप्रीत सिंह (३९ मिनिट) आणि सिमरनजित सिंह (४७ मिनिट) यांच्या गोलच्या जोरावर स्कोअर २-१ असा केला. मात्र अखेरच्या काही मिनिटांत यजमान संघाचा बचाव कमी पडला आणि दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत पोहोचले. बेल्जियमच्या सायमन गोगनार्डने ५६ व्या मिनिटाला गोल केला. या ड्रॉसोबतच जागतिक रँकिंगमध्ये पाचव्या स्थानावर असलेल्या भारताने गटात अव्वल स्थान मिळवले आहे. गोल अंतराच्या तुलनेत भारत बेल्जियमपेक्षा पुढे आहे. दोन्ही संघांनी आपल्या दोनपैकी एका सामन्यात विजय मिळवला आहे.
भारताने दक्षिण आफ्रिकेला ५-० ने पराभूत केले होते, तर बेल्जियमने कॅनडाला २-१ पराभूत केले. भारतीय संघाचा पुढचा सामना आठ डिसेंबरला कॅनडासोबत होईल, तर बेल्जियमचा संघ दक्षिण आफ्रिकेशी भिडेल.
गेल्या सामन्याच्या तुलनेत भारतीय संघ बेल्जियमविरोधात सुरुवातीच्या दोन क्वार्टरमध्ये विखुरलेला होता. यजमान संघाच्या मिडफिल्डमधील संयोजनात कमतरता दिसली. त्यामुळे त्यांना गोल करण्याच्या संधी निर्माण करता आल्या नाहीत. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये रेड लायन्सचा दबदबा दिसला. त्यांनी यजमान संघाच्या बचावफळीवर अनेक वेळा हल्ले केले.
बेल्जियमला दुसºया मिनिटातच गोल करण्याची संधी मिळाली होती. त्यांना सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले मात्र भारतीय डिफेन्सला ते भेदू शकले नाहीत. आठव्या मिनिटाला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला त्यावर हेंड्रिक्स याने पहिला गोल केला. हाफटाईमनंतर भारतीय संघाचा खेळ सुधारला. तिसºया क्वार्टरमध्ये भारताने वेगाने दबाव निर्माण केला आणि ३९ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला. आणि त्यावर हरमनप्रीत सिंह याने गोल करीत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली.
चौथ्या क्वार्टरमध्ये सिमरनजित सिंह याने स्पर्धेतील आपला तिसरा गोल केला. कोथाजित सिंह याने उजव्या बाजूने दिलेल्या पासवर सिमरनजित सिंह याने शानदार गोल केला. त्यामुळे भारताने २-१ अशी आघाडी घेतली. सामना संपण्यास पाच मिनिटे शिल्लक असताना बेल्जियमने गोलकीपरला बाहेर पाठवत अतिरिक्त खेळाडू मैदानात पाठवला. त्याचे फळदेखील त्यांना मिळाले. गोगनार्डने गोल करत संघाला २-२ अशी बरोबरी साधून दिली. भारतीय संघाने अखेरच्या मिनिटात काही चांगल्या चाली रचल्या. मात्र बेल्जियमने गोलकीपर नसतानाही चांगला बचाव केला.
>कॅनडा-दक्षिण आफ्रिका लढत ड्रॉ
कॅनडा आणि दक्षिण आफ्रिकेने रविवारी येथे झालेल्या पूल सीमध्ये आपल्या दुसºया सामन्यात १-१ असा ड्रॉ खेळत बाद फेरीत पोहोचण्याच्या आशा कायम ठेवल्या. विश्वरँकिंगमध्ये ११ व्या स्थानावर असलेल्या कॅनडाने १५ वे रँकिंग असलेल्या दक्षिण आफ्रिकेला कडवी टक्कर दिली. एनकोबिले एनटुली याच्या शानदार रिव्हर्स स्टिकने केलेल्या गोलच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने सामन्यात ४३ व्या मिनिटाला आघाडी घेतली. मात्र संघ जास्त वेळ या गोलचा आनंद साजरा करू शकला नाही. दोन मिनिटांतच कॅनडाचा कर्णधार स्कॉट टप्पर याने पेनल्टी स्ट्रोकला गोलमध्ये बदलत स्कोअर १ -१ असा बरोबरीत आणला.

Web Title: India stalled Belgium 2-2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.