ऑलिम्पिकपटू घडवणाऱ्या 'हॉकी' गुरूचा सन्मान; क्लेरेन्स लोबोंना द्रोणाचार्य पुरस्कार

By स्वदेश घाणेकर | Published: September 20, 2018 08:24 PM2018-09-20T20:24:34+5:302018-09-20T20:27:54+5:30

क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा यंदाचा द्रोणाचार्य पुरस्कार लोबो यांना जाहीर झालेला आहे. मुंबई, महाराष्ट्र आणि भारतीय हॉकी क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य आज खऱ्या अर्थाने सार्थकी लागले. 

Honor of 'Hockey' master ; Clarence Lobo get Dronacharya Award | ऑलिम्पिकपटू घडवणाऱ्या 'हॉकी' गुरूचा सन्मान; क्लेरेन्स लोबोंना द्रोणाचार्य पुरस्कार

ऑलिम्पिकपटू घडवणाऱ्या 'हॉकी' गुरूचा सन्मान; क्लेरेन्स लोबोंना द्रोणाचार्य पुरस्कार

Next
ठळक मुद्देभारतीय पुरुष हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक लोबो हे गेली अनेक वर्ष ते हॉकी क्षेत्रात कार्यरत आहेत.

मुंबई  : केंद्र सरकारने गुरुवारी जाहीर केलेल्या राष्ट्रीय पुरस्कारात एक नाव मुंबईतील ओळखीचे होते. मुंबई व महाराष्ट्राच्या हॉकी क्षेत्रात सतत चर्चेत असलेले क्लेरेन्स लोबो यांचे ते नाव.  क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा यंदाचा द्रोणाचार्य पुरस्कार लोबो यांना जाहीर झालेला आहे. मुंबई, महाराष्ट्र आणि भारतीय हॉकी क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य आज खऱ्या अर्थाने सार्थकी लागले. 

भारतीय पुरुष हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक लोबो हे गेली अनेक वर्ष ते हॉकी क्षेत्रात कार्यरत आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले," २५ वर्षांच्या मेहनतीचं चीजं झालं. आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे पडत आहेत. कधी वाटलेही नव्हते की हा मानाचा पुरस्कार मला मिळेल. माझ्या विद्यार्थ्यांनी यंदा माझ्याकडे पुरस्कारासाठी अर्ज करण्याचा आग्रह धरला. त्यामुळे अर्ज केला आणि आज नाव जाहीर झाले. याचा खूप आनंद झाला आहे."

१९९३ पासून लोबो यांनी हॉकी प्रशिक्षणाला सुरुवात केली. मुंबई संघापासून सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्र, भारतीय कनिष्ठ संघ आणि भारतीय वरिष्ठ संघ असा सुरूच राहिला. राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतरही लोबो यांनी हॉकीला भरभरून दिले. मुंबई व महाराष्ट्र येथील हॉकी स्पर्धांना ते जातीने हजर असत. खेळाडूंना सतत मार्गदर्शन करत. कोणताही खेळाडू त्यांच्याकडे काही शिकायला गेला आणि तो रित्या हाताने परतला असे कधी झाले नाही. 

 

धनराज पिल्ले, सरदार सिंग, इ तिर्की, पी आर श्रीजेश, विरेन रस्कीना, संदीप सिंग, एस व्ही सुनील आणि व्ही रघुनाथ या माजी - आजी खेळाडूंनी आग्रह केल्यामुळे  या पुरस्कारासाठी अर्ज भरल्याचे त्यांनी सांगितले. या पुरस्कारामुळे जबाबदारी अधिक वाढल्याचे सांगत ते  म्हणाले की,"जबाबदारी नक्की वाढली आहे. पण पुरस्कारामुळे आत्मविश्वासही तितकाच वाढला आहे. ग्रास रुट लेव्हलवर काम करण्याची इच्छा आहे. अजूनही आपले बेसिक हॉकी कच्च आहे. त्यात सुधारणा होणे गरजेचे आहे." 

 

त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने जिंकलेली पदक

सुवर्णपदक : सुलतान अझलन शाह चषक स्पर्धा, २०१०

रौप्यपदक : राष्ट्रकुल स्पर्धा, २०१०

कांस्यपदक : आशियाई स्पर्धा, २०१०

सुवर्णपदक : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी , २०११

रौप्यपदक : FIH चॅम्पियन्स चॅलेंज, २०११

कांस्यपदक : सुलतान अझलन शाह चषक स्पर्धा, २०१२ 

रौप्यपदक : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी , २०१२

सुवर्णपदक : FIH जागतिक फेरी ( दुसरी), २०१३

Web Title: Honor of 'Hockey' master ; Clarence Lobo get Dronacharya Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी