कोरोना वायरसच्या भीतीमुळे अझलान शाह हॉकी स्पर्धा स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 04:19 AM2020-03-03T04:19:01+5:302020-03-03T04:19:10+5:30

जगभरात नोवेल कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन सोमवारी अझलान शाह कप हॉकी स्पर्धेचे २९ वे पर्व एप्रिल ऐवजी सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात निर्णय घेण्यात आला.

Azlan Shah hockey tournament postponed due to fear of Corona virus | कोरोना वायरसच्या भीतीमुळे अझलान शाह हॉकी स्पर्धा स्थगित

कोरोना वायरसच्या भीतीमुळे अझलान शाह हॉकी स्पर्धा स्थगित

Next

नवी दिल्ली : जगभरात नोवेल कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन सोमवारी अझलान शाह कप हॉकी स्पर्धेचे २९ वे पर्व एप्रिल ऐवजी सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात निर्णय घेण्यात आला. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार अझलान शाह चषक स्पर्धेचे आयोजन मलेशियातील इपोहमध्ये ११ ते १८ एप्रिल या कालावधीत होणार होते, पण आता ही स्पर्धा २४ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबर या कालावधीत होईल. यात नियमितपणे सहभागी होणाऱ्या भारतीय संघाचा यावेळी स्पर्धेत सहभागी होण्याचा कार्यक्रम नाही.
आयोजन समितीचे अध्यक्ष डेतो हाजी अब्द रहीम विन मोहम्मद यांनी सांगितले की, ‘हा निर्णय खेळाडू, अधिकारी व सर्व बाजूंचा विचार करुन घेण्यात आला असून सुलतान अझलान शाह चषक पुरुष हॉकी स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे.’ आयोजन समितीने त्यामुळे होणाºया त्रासासाठी क्षमा मागितली आहे, पण सध्याचे संकट लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले.
आयोजन समितीनुसार एफआयएच (आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ), एएचएफ (आशियाई हॉकी महासंघ), एमएचसी (मलेशिया हॉकी महासंघ) व स्पर्धेत सहभागी होणाºया संघांना या निर्णयाची माहिती देण्यात आलेली आहे. धोकादायक कोरोना व्हायारसमुळे यापूर्वीही अनेक स्पर्धा रद्द, स्थगित किंवा स्थानांतरित कण्यात आलेल्या आहेत. (वृत्तसंस्था)
>आशियाई चालण्याची शर्यत रद्द
जपानमध्ये १५ मार्च रोजी प्रस्तावित असलेली २० किमी आशियाई पायी चालण्याची शर्यत कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे रद्द झाली आहे. या स्पर्धेत १३ धारतीय स्पर्धक सहभागी होणार होते. टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेली भावना जाट ही नोमी शहरात होणाºया या स्पर्धेत भारतीय पथकाचे नेतृत्व करणार होती. जपानच्या महासंघाने केुलेल्या विनंतीवरून आशियाई अ‍ॅथलेटिक्स महासंघाने आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Azlan Shah hockey tournament postponed due to fear of Corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी