वृद्धेच्या खुनाचा उलगडा होत नसल्याने ग्रामस्थांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 06:02 PM2020-03-05T18:02:13+5:302020-03-05T18:03:57+5:30

राष्ट्रीय महामार्गावर चार तास रास्तारोको आंदोलन

The villagers rastroko since the murder of the elderly is not revealed | वृद्धेच्या खुनाचा उलगडा होत नसल्याने ग्रामस्थांचा रास्तारोको

वृद्धेच्या खुनाचा उलगडा होत नसल्याने ग्रामस्थांचा रास्तारोको

Next
ठळक मुद्देवृद्धेचा खुनाचा तपास लागत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक

सेनगाव :तालुक्यातील तळणी येथे दोन महिन्या पूर्वी वयोवृद्ध महिलेचा शेतात खुन झाला होता.या खुनाचा तपास लावण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नसून मारेकरी मोकाट आहेत .याच्या निषेधार्थ गुरुवारी ( दि. ५ ) तळणी येथील ग्रामस्थांनी  रिसोड-हिगोली महार्गावर रास्तारोको आंदोलन केले. 

तळणी येथील मथुराबाई पांडुरंग कोरडे (६७) या महिलेचा दि.५ जानेवारी ला शेतात गळा आवळून खुन करण्यात आला होता. अज्ञात आरोपींने सदर वयोवृद्ध महिलेचा अंगावर असलेले ८२ हजार रुपये किमतीचे दागिने हि चोरून नेले होते.या घटनेला जवळपास दोन महिने पूर्ण झाले परंतु, नर्सि पोलीस ठाण्याला या खुनाचा अद्याप उलगडा करता आला नाही. पोलीस यंत्रणा पुरती अपयशी ठरत असल्याने याच्या निषेधार्थ तळणी ग्रामस्थांनी गुरुवारी रास्तारोको आंदोलन केले. यावेळी आरोपींच्या अटकेची मागणी करत रिसोड -हिगोली या राष्ट्रीय महामार्गावर तळणी फाटा येथे ग्रामस्थांनी सकाळी १० ते १ दरम्यान चार तास रास्तारोको करत वाहने अडवून धरली. उपविभागीय पोलीस अधिकारी  ऐ.बी.खान, सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर यांनी भेट घेऊन दहा दिवसांत तपास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. 

आंदोलनात सरपंच महादु खंदारे,जनार्धन कोरडे,माणिक कोरडे,भाऊराव कोरडे,नामदेव कोरडे,विश्ववनाथ कोरडे,गोपाल कोरडे,दशरथ कोरडे,राजाराम कोरडे,सोमगीर गिरी,बाबाराव खंदारे,रामेश्वर कोरडे,गणपत कोरडे राजाराम खनपटे यांच्यासह मोठ्यासंख्येने ग्रामस्थ सहभागी होते. 

Web Title: The villagers rastroko since the murder of the elderly is not revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.