धक्कादायक ! आईच्या मृत्यूचे वृत्त समजताच मुलीनेही सोडले आपले प्राण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 08:02 PM2020-08-06T20:02:09+5:302020-08-06T20:04:49+5:30

आई, मुलीवर एकाच दिवशी अंत्यसंस्कार

Upon hearing the news of her mother's death, the girl also gave up her life! | धक्कादायक ! आईच्या मृत्यूचे वृत्त समजताच मुलीनेही सोडले आपले प्राण!

धक्कादायक ! आईच्या मृत्यूचे वृत्त समजताच मुलीनेही सोडले आपले प्राण!

Next
ठळक मुद्देहिंगोली जिल्ह्यातील घटना हृदविकाराच्या झटकेने निधन

गिरगाव (जि. हिंगोली) : जन्म देणाऱ्या आईच्या मृत्यूची वार्ता कळताच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्रिवेणाबाई लक्ष्मणराव नरडेले (५५) या मुलीनेही प्राण सोडले. ही घटना वसमत तालुक्यातील खाजमापूरवाडी येथे ५ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. 

वसमत तालुक्यातील खाजमापूर वाडी येथील त्रिवेणाबाई नरडेले यांचे माहेर वसमत तालुक्यातीलच बारेपुरवाडी येथील आहे. त्यांच्या आई शिवकाशी गणपतराव दत्तगोंडे (८५) या अर्धांगवायूच्या आजाराने मागील दोन महिन्यांपासून त्रस्त होत्या. त्याच आजारात त्यांचे ५ आॅगस्ट रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास निधन झाले. दरम्यान, शिवकाशी यांच्या मृत्यूची माहिती देण्यासाठी खाजमापूर वाडी येथील त्यांची मुलगी त्रिवेणाबाई नरडेले यांच्या मुलाला नातेवाईकांनी फोन केला. ही वार्ता मुलाने घरात सांगताच त्रिवेणाबाई नरडेले यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचेही निधन झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. 

आई, मुलीवर एकाच दिवशी अंत्यसंस्कार
५ आॅगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजेदरम्यान शिवकाशी दत्तगोंडे यांच्यावर बारेपूरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते आटोपून नातेवाईकांनी तात्काळ खाजमापूरवाडी गाठली. दुपारी ४ वाजता शिवकाशी यांची मुलगी त्रिवेणाबाई नरडेले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवकाशी यांच्या पश्चात पती, दोन मुले, तीन मुली व नातवंडे, असा परिवार आहे, तर त्रिवेणाबाई नरवाडे यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली व नातवंडे, असा परिवार आहे.

Web Title: Upon hearing the news of her mother's death, the girl also gave up her life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.