किराणा दुकान फोडणारे चोरटे पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:57 AM2021-03-04T04:57:19+5:302021-03-04T04:57:19+5:30

शहरातील शेख फारूख शेख करीम तांबोळी (रा. खडकपुरा) यांचे हरणचौक येथे किराणा दुकान आहे. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ...

Thieves break into grocery store | किराणा दुकान फोडणारे चोरटे पोलिसांच्या ताब्यात

किराणा दुकान फोडणारे चोरटे पोलिसांच्या ताब्यात

Next

शहरातील शेख फारूख शेख करीम तांबोळी (रा. खडकपुरा) यांचे हरणचौक येथे किराणा दुकान आहे. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता ते दुकानात गेले असता त्याच्या दुकानात चोरी झाल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी २ मार्च रोजी शेख फारूख यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांनी तपासाची चक्रे फिरवित डी.बी. पथकासह कर्मचारी कामाला लावले होते. यातील आरोपी हे पारधीवाडा येथे असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. त्यावरून रवि रामा पवार, दीपा रवि पवार, काजल दादू चव्हाण (सर्व रा. पारधीवाडा) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच पोलिसांनी त्यांच्याकडून गोडतेलाचे पाच लीटरच्या प्लॅस्टिकची कॅन, तांदळाचे २५ किलोचे चार कट्टे, वीस फूट लोखंडी ॲंगल, गोडतेलाचे १ लीटरचे १२ पाकिटे असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, पोलीस हवालदार एम.आर. शेख, मुजिब शेख, असलम गारवे, उमेश जाधव, दिलीप बांगर, होळकर, गणेश लेकुळे यांच्या पथकाने केली.

Web Title: Thieves break into grocery store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.