...तर आम्ही घेणार तलावात उड्या; तलाबकट्टावरील अतिक्रमणधारक आले रडकुंडीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 07:55 PM2020-02-21T19:55:18+5:302020-02-21T19:55:37+5:30

तलाबकट्टा परिसरातील १९५ अतिक्रमणधारकांना प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत.

... then we will fly into the lake; The encroachment holder of Hingoli | ...तर आम्ही घेणार तलावात उड्या; तलाबकट्टावरील अतिक्रमणधारक आले रडकुंडीला

...तर आम्ही घेणार तलावात उड्या; तलाबकट्टावरील अतिक्रमणधारक आले रडकुंडीला

Next
ठळक मुद्देआम्हाला याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने येथे कायम ठेवा.

हिंगोली : आमची तिसरी पिढी या तलाबकट्ट्यावर राहत आहे. आता ही जागा सोडू वाटत नाही. मात्र आम्हाला दुसरीकडेही जागा नाही. आता पुनर्वसन न करताच हटविले तर तलावात उड्या घेवू, असा इशारा धुपरताबाई ओंकार देवकते, वच्छलाबाई ढोके या वृद्धांनी दिला.

तलाबकट्टा परिसरातील १९५ अतिक्रमणधारकांना प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत. आता त्यांना अंतिम इशारा देवून स्वत: अतिक्रमण न हटविल्यास प्रशासन ते काढणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ज्यांची आर्थिक कुवत आहे, अशांनी इतरत्र जागा शोधण्याचे अथवा भाड्याने राहण्याची व्यवस्था करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. मात्र हातावरच पोट असलेल्या काहींना हे जमत नसल्याने ते अजूनही शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. आज पुन्हा काही जणांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेत गाºहाणे मांडले. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या अतिक्रमणाबाबत याचिका टाकली असून त्याचा निकाल येईपर्यंत अतिक्रमण हटवू नये, अशी मागणी केली. त्यात २00२ च्या शासन निर्णयाचा दाखला देत मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये १९८५ च्या अगोदरपासून असलेली अतिक्रमणे नियमित करण्यास सांगितले आहे, असे निवेदनात म्हटले. आम्हाला याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने येथे कायम ठेवा. दीड ते दोन हजार लोकांचा हा समूह असून लहान मुले, वृद्ध, बाळंत  महिला, शिक्षण घेणाऱ्या मुलांवर याचा परिणाम होणार असल्याचे निवेदनात म्हटले. मराठा शिवसैनिक सेनेचे विनायक भिसे यांच्या नेतृत्वात कमल कुरील, मन्नू कुरील, शेख उस्मान, स.युनूस, शेख मेहबूब, राधेश्याम मुदिराज, मीना शर्मा आदींच्या सह्यांचे निवेदन दिले.

मंदिरावर जमली वयोवृद्ध मंडळी
प्रशासनाला तक्रार दिल्यानंतर तलाबकट्टा भागातील मारुती मंदिरावर या भागातील नागरिकांसह वृद्ध मंडळी जमली होती. यावेळी या महिलांनी आता पुनर्वसन न करताच हलविले तर जायचे कुठे? असा प्रश्न उपस्थित केला. काहींच्या डोळ्यातून तर आश्रूंच्या धारा लागल्याचे दिसत होते. धुरपताबाई देवकते व वच्छलाबाई ढोके या दोन वृद्धांनी मात्र आमची सगळी हयात येथे गेली. आतापर्यंत कुणीच आम्हाला हटविले नाही. आता या वयात आर्थिक परिस्थिती नसतानाही नातू-पोतू घेवून जायचे कुठे? जागा न दिल्यास तलावात उड्या घेण्याचा इशाराही दिला.

Web Title: ... then we will fly into the lake; The encroachment holder of Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.