The student was pushed from the ceiling by a debate in the exam | परीक्षेतील वादातून विद्यार्थ्यास छतावरून ढकलले
परीक्षेतील वादातून विद्यार्थ्यास छतावरून ढकलले

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) :  औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथील कृषी महाविद्यालयात पदवीच्या परीक्षेदरम्यान झालेल्या वादातून सोमवारी सकाळी द्वितीय वर्षातील  विशाल रेंगे (रा. परभणी) याला तृतीय वर्षातील संतोष जवळगे (रा.औंढा ) याने छतावरून ढकलून दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली.  जखमी विशाल नांदेडच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

गोळेगाव येथील कृषी महाविद्यालयात सोमवारी साडेअकराच्या सुमारास पदवीच्या परीक्षा सुरू होत्या. विद्यापीठाकडे पर्यायी जागा नसल्यामुळे इमारतीच्या छतावर या परीक्षा सुरू होत्या. द्वितीय वर्षातील विशाल व तृतीय वर्षाचा संतोष या दोघांमध्ये काही कारणावरून हाणामारी झाली. या दोघांमधील भांडण जोरात सुरू असताना संतोषने विशालला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून म्हणजेच २० ते २५ फूट उंचीवरुन ढकलून दिले. इमारतीखाली मैदानात गट्टू असल्याने विशाल गंभीर जखमी झाला. त्याला महाविद्यालय प्रशासनाने औंढा येथीलग्रामीण रुग्णालयात दाखल 
केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला नांदेड येथे पाठविण्यात आले आहे.

Web Title: The student was pushed from the ceiling by a debate in the exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.