थकबाकीदार शाळा केल्या सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:57 AM2021-03-04T04:57:17+5:302021-03-04T04:57:17+5:30

हिंगोली : शहरातील तीन थकबाकीदार शाळांनी थकबाकी न भरल्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करत तिन्ही शाळा सीलबंद केल्या आहेत. ही कार्यवाही ...

Seals made to outstanding schools | थकबाकीदार शाळा केल्या सील

थकबाकीदार शाळा केल्या सील

Next

हिंगोली : शहरातील तीन थकबाकीदार शाळांनी थकबाकी न भरल्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करत तिन्ही शाळा सीलबंद केल्या आहेत. ही कार्यवाही न. प.च्या पथकाने बुधवारी केली.

नगर परिषद कार्यालयामार्फत वसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. थकबाकीदारांकडून थकीत कराची रक्कम वसूल करण्याची कार्यवाही न. प.मार्फत सुरूही करण्यात आली आहे. त्यानुसार शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक शाळा हिंगोली यांच्याकडे मालमत्ता कराची २००२-०३ ते २०२०-२१ पर्यंतचे ८ लाख १६ हजार ९४० रुपये, जुनी मल्टीपर्पज हायस्कूल जि. प. हिंगोली यांच्याकडे मालमत्ता कराची थकबाकी २००९-१० ते २०२०-२१ पर्यंतचे ५ लाख २४ हजार १६२ आणि जि. प. कन्या प्राथमिक शाळा यांच्याकडे २००४-०५ ते २०२०-२१ पर्यंतच्या थकीत कराची रक्कम ७ लाख ८३ हजार ६४२ बाकी आहे. या तिन्ही शाळांना वारंवार पत्रेही पाठविली होती; परंतु टाळाटाळ केली गेली आहे, असे पथकाचे म्हणणे आहे.

सदरील शाळांनी थकबाकीची रक्कम न. प. कडे न भरल्यामुळे ३ मार्च रोजी मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तिन्ही इमारतींना सील ठोकले. पथकामध्ये उपमुख्याधिकारी उमेश हेबांडे, प्रशासकीय अधिकारी श्याम माळवटकर, कार्यालयीन अधीक्षक डी. बी. ठाकूर, वसुली लिपिक विजेंद्र हेलचल, संदीप घुगे, नितीन पहिनकर यांचा समावेश होता.

थकबाकी भरण्याचे न. प.चे आवाहन

सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व खाजगी मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराची व पाणीपट्टीची थकीत व चालू वर्षाचा कर भरणा करावा, अन्यथा नियमाप्रमाणे कार्यवाही करावी लागेल, असे मुख्याधिकारी कुरवाडे यांनी कळविले आहे.

Web Title: Seals made to outstanding schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.