मुद्रांक शुल्क थकबाकीदारांना रक्कम जमा करण्याची नाेटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:27 AM2021-01-22T04:27:42+5:302021-01-22T04:27:42+5:30

हिंगोली : मालमत्ता खरेदीच्या दस्त नोंदणीत महालेखापाल नागपूर यांनी दुय्यम निबंधक कार्यालयाच्या केलेल्या तपासणीत मालमत्तेचे मूल्य कमी दाखवून ...

Notice of deposit to stamp duty arrears | मुद्रांक शुल्क थकबाकीदारांना रक्कम जमा करण्याची नाेटीस

मुद्रांक शुल्क थकबाकीदारांना रक्कम जमा करण्याची नाेटीस

Next

हिंगोली : मालमत्ता खरेदीच्या दस्त नोंदणीत महालेखापाल नागपूर यांनी दुय्यम निबंधक कार्यालयाच्या केलेल्या तपासणीत मालमत्तेचे मूल्य कमी दाखवून मुद्रांक शुल्क कमी भरलेल्या ८ थकबाकीदारांची नावे सह. जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संजय पाटील यांनी जाहीर करत संबंधितांना नाेटीस देण्यात आली आहे.

मालमत्ता खरेदीच्या दस्त नोंदणीमध्ये मालमत्तेचे मूल्यांकन कमी दाखवून मुद्रांक शुल्कापोटी कमी रक्कमेचा भरणा करणाऱ्याकडून थकीत मुद्रांक शुल्काची रक्कम वसूल करण्याची कार्यवाही सह. जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येणार आहे. त्यामध्ये शैलेश रमेशलाल जैस्वाल, विनायक श्रीराम भिसे, संतोष श्रीराम भिसे (रा. हिंगोली) यांच्याकडे १ लाख ७६ हजार २५ थकबाकीची रक्कम आहे तर श्रीराम नारायण कानबाळे, संतोष श्रीराम भिसे (रा. हिंगोली) ४९ हजार ३६०, श्रीनिवास द्वारकादास मुदंडा, पुष्पाताई भ्र गणेशलाल जैस्वाल (रा. हिंगोली) ३ लाख ४० हजार ७२५, मोहम्मद उमर अब्दुल गनी, सय्यद युनूस सय्यद मन्सूर (रा. हिंगोली) ७३ हजार ७४०, लक्ष्मीकांत जयकिशनजी लड्डा (रा. मोर्शी रोड, अमरावती) २ लाख ८ हजार २०, तुकाराम सीताराम शिंदे, नारायण शंकरराव बुद्रक, विलास लक्ष्मणअप्पा गोठरे (रा. हिंगोली) ७४ हजार ७००, सतीष सोपानराव येरनाळे रा. विराळ, ता. जळकोट, जि. लातूर ३ लाख ३९ हजार ८४० आणि प्रविण मांगीलालजी भंडारी (मे. महेश असो. गंगाखेड) ३ लाख ३९ हजार ८४० थकीत रक्कम भरलेली नाही. याकरीता या थकबाकीदारांनी रक्कमा भरणा करण्यासंदर्भात वेळोवळी नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर थकबाकीदारांनी थकीत असलेली रक्कम (दंडासह) १५ दिवसांत जमा करावी, अन्यथा महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम ४६ नुसार संबंधित थकबाकीदाराच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा जाहीर लिलावाद्वारे विक्री करून सदर रक्कम वसूल करण्यात येईल.

Web Title: Notice of deposit to stamp duty arrears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.