पर जिल्हांतर्गत रातराणी, परराज्यात कधी सुरु होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:11 AM2021-08-02T04:11:08+5:302021-08-02T04:11:08+5:30

हिंगोली: कोरोना महामारी ओसरत चालल्याचे पाहून शासनाच्या आदेशानुसार लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू केल्या आहेत. तसेच पर जिल्हांतर्गत रातराणीही सुरू ...

Per night in the district, when will it start in the state? | पर जिल्हांतर्गत रातराणी, परराज्यात कधी सुरु होणार?

पर जिल्हांतर्गत रातराणी, परराज्यात कधी सुरु होणार?

Next

हिंगोली: कोरोना महामारी ओसरत चालल्याचे पाहून शासनाच्या आदेशानुसार लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू केल्या आहेत. तसेच पर जिल्हांतर्गत रातराणीही सुरू केल्या आहेत. परंतु, अजून तरी पर राज्यातील रातराणी सुरू केल्या नाहीत. सद्यस्थितीत हैदराबादसाठी दिवसासाठी बस सुरू आहे. प्रवाशांची मागणी आली तर पर राज्यासाठी रातराणी सुरु केली जाईल, असे एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शासन व जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील हिंगोली, वसमत आणि कळमनुरी आगारांनी जिल्हांतर्गत लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू केल्या आहेत. हिंगोली आगाराने हिंगोली ते पुणे, हिंगोली ते कोल्हापूर आणि हिंगोली ते सोलापूर या तीन बसेस रातराणी म्हणून सुरू केल्या आहेत. हिंगोली व वसमत आगारातून हैदराबाद या राज्यासाठी दिवसाचा प्रवास करण्यासाठी बस सुरू केली आहे. प्रवाशांनी मागणी केली तर परराज्यातही रातराणी सुरू केली जाईल, असे एस. टी. महामंडळाने सांगितले.

सध्या सुरू असलेल्या राज्यांतर्गत रातराणी...

हिंगोली ते पुणे

हिंगोली ते सोलापूर

हिंगोली ते कोल्हापूर

परराज्यात रातराणीच नाही...

हिंगोली जिल्ह्यातून दिवसासाठी परराज्यात बस आहे. परंतु, रातराणी नाही. त्यामुळे परराज्यातून आलेल्या प्रवाशांना मुक्कामीच रहावे लागते. सकाळ उजाडल्यानंततर परराज्याचा प्रवास करावा लागतो.

सीमेलगतचा संबंध नाही...

हिंगोली सर्व राज्यांच्या मध्यभागी आहे. देगलूर, बिलोली, धुळे, मुक्ताईनगर ही सीमालगत गावे आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या प्रवाशांना रातराणी बसेसची आवश्यकता असते. या भागातील आगारांनी रातराणी बसेसची व्यवस्था प्रवाशांसाठी केली आहे. हिंगोली व वसमत येथून पर राज्यासाठी दिवसाची बस सुरु केली आहे. रातराणीची मागणी आल्यास तीही बस सुरू केली जाईल.

-संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख

परराज्यात जाण्यासाठी होतो त्रास...

पर राज्यात जाण्यासाठी रातराणी बस नसल्यामुळे अनेक प्रवाशांंना हिंगोली शहराच्या ठिकाणी मुक्कामी रहावे लागते. एस. टी. महामंडळाने परराज्यासाठी रातराणी बस सुरू करणे गरजेचे आहे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

पर राज्यात रातराणी बसने गेल्यास व्यापाराच्या दृष्टीने ते फायद्याचे आहे. सकाळी उठून मोठ्यात शहरात वस्तू खरेदी करता येतात. यानंतर पर राज्यातून परत वापसी मूळगावी येता येते. हे व्यापाऱ्यांच्या दृष्टीने हिताचे आहे. तेव्हा एस. टी. महामंडळाने हिंगोली आगारातून पर राज्यासाठी रातराणी बस सुरू करावी, अशी मागणी व्यापारी व प्रवाशांनी केली आहे.

Web Title: Per night in the district, when will it start in the state?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.