The mother run away by throwing six months dead baby in the field | सहा महिन्याच्या मृत बाळास शेतात फेकून मातेचे पलायन
सहा महिन्याच्या मृत बाळास शेतात फेकून मातेचे पलायन

आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : सहा महिन्याच्या मृत मुलीस शेतात फेकून मातेने पलायन केल्याची घटना गुरुवारी (दि. २० ) सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव गवळी येथे ही घटना याप्रकरणी बाळापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव गवळी या गावाजवळ सुनील मंदाडे यांच्या मालकीचे शेत आहे. आज सकाळी ९. ३० वाजेच्या सुमारास ग्रामस्थांना शेतात मृत अवस्थेतील बाळ आढळून आले. यानंतर पोलीस पाटील सचिन मंदाडे यांनी ही खबर बाळापूर पोलिसांना दिली. ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश राहिरे, जमादार दादाराव सूर्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


Web Title: The mother run away by throwing six months dead baby in the field
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.