लोकअदालतीतून जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीआधारे निकाली काढावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:11 AM2021-08-02T04:11:11+5:302021-08-02T04:11:11+5:30

हिंगोली : लोकअदालतीमधून जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीआधारे निकाली काढावीत, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. बी. शिंदे ...

The maximum number of cases should be settled through Lok Adalat on the basis of compromise | लोकअदालतीतून जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीआधारे निकाली काढावीत

लोकअदालतीतून जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीआधारे निकाली काढावीत

Next

हिंगोली : लोकअदालतीमधून जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीआधारे निकाली काढावीत, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. बी. शिंदे यांनी केले. जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित लोकअदालतीच्या उद्घाटनप्रसंगी १ ऑगस्ट रोजी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शेषराव पतंगे होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र आणि गोवा विधि परिषदेचे अध्यक्ष ॲड. अनिल गोवरदीपे, भारतीय विधि परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. सतीश देशमुख उपस्थित होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून न्यायाधीश पालदेवार, न्यायाधीश बुलबुले, न्यायाधीश पाटील, न्यायाधीश निवघेकर, न्यायाधीश जोशी, न्यायाधीश खान यांच्यासह यवतमाळ वकील संघाचे अध्यक्ष ॲड. जितेंद्र बारडकर, ॲड. ठाकरे, ॲड. अनिल बजाज, ॲड. राजेश चव्हाण, श्रीराम देव्रस, डॉ. अनिल बंड, डॉ. गोतमारे, आदींची उपस्थिती होती. यावेळी गोवर दीपे, ॲड. सतीश देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. कोरोना संसर्ग लक्षात घेता वकिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत कामकाज करावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी वकील संघाचे सदस्य ॲड. अग्रवाल, ॲड. राठोड, ॲड. शिरसाट, ॲड. इंगळे, ॲड. खंडारे, ॲड. आखिल अहमद, ॲड. मुक्तार तसेच न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार उपस्थित होते. सूत्रसंचालन वकील संघाचे सचिव ॲड. धम्मदीप खंदारे यांनी केले.

फोटो :

Web Title: The maximum number of cases should be settled through Lok Adalat on the basis of compromise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.