कळमनुरी उपजिल्हा रूग्णालयातील अधिकारी - कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 04:12 PM2019-07-12T16:12:51+5:302019-07-12T16:15:22+5:30

मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार

Kalamnuri Sub-District Hospital Officers - Workmen's Bandha agitaion | कळमनुरी उपजिल्हा रूग्णालयातील अधिकारी - कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

कळमनुरी उपजिल्हा रूग्णालयातील अधिकारी - कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

Next

कळमनुरी (हिंगोली ) : येथील उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १२ जुलैपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. उपचारासाठी येणारे रूग्णासोबतचे नातेवाईक अधिकारी व कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागत असून दमदाटी केली जात असल्याने कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. 

उपजिल्हा रूग्णालयातील जवळपास ६८ अधिकारी व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले असून सकाळपासूनच आंदोलन सुरू आहे. कामबंद आंदोलनामुळे मात्र उपचारासाठी येणाऱ्यांची गैरसोय होत आहे. रूग्ण्सेवा विस्कळीत झाली असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहिल असा पावित्रा वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. आंदोलनात वैद्यकीय अधिकारी डॉ. एफ. जी. शेख, डॉ. ए. बी. बांगर यांच्यासह १२ वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी एकूण ६८ जण सहभागी झाले आहेत.

Web Title: Kalamnuri Sub-District Hospital Officers - Workmen's Bandha agitaion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.